सांस्कृतिक कार्यक्रमांनी नागरिकांची भरभरून जिकंली मने.
विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी क्र 9421856931
एटापल्ली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड’ कंपनीच्या वतीने एटापल्ली येथे एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलच्या भव्य पटांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन डॉ.मितालीताई हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एटापल्ली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रेखाताई मोहूर्ले होत्या.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून लॉयड्स मेटलच्या निर्देशिका कीर्ती रेड्डी,लॉयड्स राज विद्यानिकेतन (हेडरी) च्या निर्देशिका सुनीता मेहता, मुख्याध्यापिका अर्चना जोशी, लॉयड्स कालीअम्माल दवाखान्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.प्रीती बुर्रीवार,पोलीस उपनिरीक्षक रोहिणी गिरवलकर यांची उपस्थिती होती.तसेच पौर्णिमा श्रीरामवार,गुलशन शेख,रेहना शेख,कलिमा शेख, सुनीता चांदेकर,शालिनी नैताम, निर्मला हिचामी आणि सरिता गावडे या मान्यवर महिलांनीही मंचाची शोभा वाढवली.
*सांस्कृतिक अविष्काराने वेधले लक्ष*
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांनी सादर केलेले सामूहिक नृत्य.आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करत महिलांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.त्यांच्या या कलेला दाद देत उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.महिला सक्षमीकरण आणि उत्साहाचे दर्शन घडवणाऱ्या या सादरीकरणाने एटापल्लीकरांची मने जिंकली.
