पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे : दिनांक ०८/१०/२०२२ रोजी इसम नागे साहेब मिलन मल्लीकरा- हडपसर, पुणे हे शनिवारवाडा पाहण्यासाठी येत असताना गाड़ीगीळ पुतळा चौक, कसबा पेठ, पुणे येथे आले असता त्यांच्या समोरुन आलेल्या तीन इसमांनी त्यांना आडवुन त्यांच्या पॅन्टच्या खिशातील रिजल मी कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढुन घेतला. तेव्हा फिर्यादी हे प्रतिकार करत असताना सदर तीन इसमांनी त्यांना हाताने मारहाण करून ते पळुन जाऊ लागले, तेव्हा फिर्यादी यांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पवळे चौक, कसबा पेठ, पुणे येथे पकडले असता त्यांनी सदर ठिकाणी देखील फिर्यादीस मारहाण केल्याने जगलेल्या गर्दीतील इसमांनी व फिर्यादीने त्या तीन इसमांना पकडुन ठेवुन पोलीसांना कळविले,
फरासखाना पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जावुन आरोपी नामे (१) केशव गणेश कठायर, वय २२ वर्षे रा. फुटपाथवर शनिवारवाडा, पुणे मुळ रा. झुराईल, जि.दोटी, देश नेपाळ, २) अॅलेक्स याननिवमी वय २३ वर्षे रा.फुटपाथवर, शनिवारवाडा, पुणे मुळ रा. खेगनम थाना माहुर जि.दिमआसव राज्य नागालैंड ३) कृष्णा तुलबहादुर झरगा वय ३४ वर्षे रा.फुटपाथवर शनिवारवाडा, पुणे मुळ रा. गुरखा, घुगी जि.पालपा देश नेपाळ यांना ताब्यात घेऊन फरासखाना पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांची अंगझडती घेतली असता नमुद आरोपीकडुन फिर्यादीचा ५०००/- रुपये किंमतीचा रिअल मी कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी नामे साहेब मिलन मल्लीकरा हडपसर, पुणे यांनी सदर तीन इसमांविरुध्द फिर्याद दिल्याने फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं १८१/२०२२ भा.दं.वि. कलम ३२४, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद आरोपीना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिकः मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे डॉ. प्रियंका नारनवरे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद, सहा पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, गणेश दळवी, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, मोहन दळवी, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, गणेश आटोळे, सुमित खुट्टे, पंकज देशमुख, तुषार खडके अजय शिंदे, महावीर वल्टे, किशोर शिंदे यांच्या पथकाने केली आहे.