राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
चंद्रपूर:- जिल्ह्यातील गोंडपिंपरी पंचायत समिती येणाऱ्या वेडगाव केंद्रातील हिरवा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तात्काळ शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नुकतेच पाठविले.
गोंडपिंपरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वेडगाव केंद्रातील हिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाच वर्गांसाठी दोनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळेमध्ये वर्ग एक ते आठ पर्यंतचे विद्यार्थी संख्या 138 आहेत. शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार शिक्षण विभागाकडे रिक्त पद भरण्याची मागणी केली. मात्र या मागणीकडे जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केले. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन हिवरा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तात्काळ शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी अशी, सूचना खासदार बाळ धानोकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

