– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने केली होती मागणी.
संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो न 9923497800
राजुरा २८ मार्च
राजुरा शहरातील मुख्य महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या वृक्षांना लक्ष करीत त्यावर अनाधिकृतपणे जाहिराती करणारे बॅनर प्लेक्स लावून झाडांवर खिळे ठोकून ताराने बांधून झाडांची मोठ्याप्रमाणात हानी केली होती. याबाबत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने अनेकदा नगर परिषद मुख्याधिकारी तथा अध्यक्ष, वृक्ष प्राधिकरण समिती यांच्याकडे लेखी, तोंडी तक्रारी केल्या होत्या. त्यानुषंगाने अखेर नगर परिषद मुख्याधिकारी निखिल लांडगे ॲक्शन मोडवर येत तात्काळ झाडांवरील अनाधिकृत बॅनर प्लेक्स काढले. यापुढे वारंवार अशाप्रकारे झाडांवर बॅनर प्लेक्स लावणे खिळे मारून झाडांना क्षती पोहचविणे आढळ्यास दोषींवर कार्यवाही करण्याचे संकेत मुख्याधिकारी यांनी दिले आहे. राजुरा शहरातील झाडांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधून घेताना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने राजुरा शहर नगर परिषद हद्द परिसरातील नवीन बस स्थानक ते पंचायत समिती चौक ते वनोद्यान व पंचायत समिती चौक ते नाका नंबर ३ ते गडचांदूर रोड तसेच शहरातील सर्वच मुख्य रस्ते येथील झाडांवर विविध व्यावसायिक, संस्था आणि व्यक्तींकडून जाहिरातींचे बॅनर आणि फ्लेक्स खिळे ठोकून, ताराने बांधून लावले असल्याचे कळविले. त्याचे फोटोसहित पुरावे दिले. महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम, १९७५ नुसार झाडांना अशा प्रकारे इजा पोहोचवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. खिळे ठोकल्यामुळे झाडांच्या जिवंत ऊतींचे नुकसान होत असून ती आतून कुजण्याची व कमकुवत होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे संबंधित ठिकाणचे सर्व बॅनर आणि खिळे तातडीने काढून झाडांना मुक्त करण्यात यावे, झाडांचे विद्रूपीकरण करणाऱ्या संबंधित व्यक्ती किंवा संस्थांवर कायदेशीर दंड आकारून कठोर कारवाई करावी, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी परिसरात गस्त वाढवावी आणि या गंभीर विषयावर त्वरित दखल घ्यावी असे बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांनी निवेदनातून विनंती केली होती. त्यामुळे लगेच नगर परिषद अधिकारी, कर्मचारी यांनी सर्व अनधिकृत बॅनर, प्लेक्स, तार खिळे काढण्याची मोहीम हातात घेत शहरातील सावली देणाऱ्या झाडांचे विद्रूपीकरण थांबविले याबद्दल नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने नगर परिषद मुख्याधिकारी निखिल लांडगे व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले आहे.

