अनिल अडकिने, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- श्री बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी ट्रस्ट अंतर्गत ताजधाम पागलखाना शरीफ येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सालाना उर्स निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने 29 मार्च रोजी वाकी दरबार येथून शाही संदल मिरवणूक काढण्यात आली आहे.
29 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजता वाकी दरबार येथून शाही संदल निघाला असून दुपारी सुमारे 2.00 वाजता पागलखाना शरीफ (वाकी दरबारचा डेरा) येथे पोहचला त्यानंतर येते कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी 5.00 वाजता संदल ताजधाम दरबारकडे रवाना झाला. त्यानंतर बाबासाहेबांना चादर पेश करण्यात आली असून भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
तसेच 30 मार्च व 31 मार्च रोजी सकाळी 9.00 वाजता नाश्ता-चहा तसेच दुपारी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन बाबांचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

