मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली ::
गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनविण्याच्या नावाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करून त्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वारंवार विरोध होऊनही शासन विविध मार्गांनी जमीन अधिग्रहण प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यापूर्वी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, जयरामपूर परिसरातील शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. त्यानंतर भेंडाळा परिसरातील 14 गावांमधील सुपीक जमीन अधिग्रहणाचा प्रयत्न झाला. स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवूनही आता पुन्हा चामोर्शी व गडचिरोली तालुक्यातील सुमारे 30 ते 35 गावांमध्ये जमीन अधिग्रहण होणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून समोर येत असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरविण्यासाठी शिवणी येथे जमीन अधिग्रहणग्रस्त गावांतील शेतकऱ्यांचे भव्य चर्चासत्र जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रात जिल्ह्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. चर्चेदरम्यान सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी एकमताने निर्णय घेत, “जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनी कोणत्याही परिस्थितीत अधिग्रहित होऊ देणार नाहीत” असा ठाम निर्धार व्यक्त केला. यासाठी आवश्यक त्या सर्व लोकशाही मार्गांचा अवलंब करण्याचा संकल्पही करण्यात आला.
महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आपल्याला अध्यक्षीय भाषनात सांगितले की, सरकार जिल्ह्यातील शेतकऱ्याला अंधारात ठेवून उद्योगपतींना फायदा पोचवण्यासाठी जमिन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया राबवीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहावे. “शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेती वाचली तर शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तर देश वाचेल. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासोबत माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, शहर अध्यक्ष सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, अनिल कोठारे, दिवाकर निसार, नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, राजेश ठाकूर, रजनीकांत मोटघरे, संजय चंने, वामनराव सावसाकडे, नितेश राठोड, अब्दुल पंजवानी, लालाजी सातपुते, सुभाष कोटारे, चोखाजी भांडेकर, चोखाजी बांबोळे, विनोद मडावी, राकेश मुरकुटे, विजय लाड, नदीम नाथानी, रवींद्र पाल, सुशील शहा, उत्तम ठाकरे, श्रीनिवास ताडपल्लीवार, हेमंत मोहितकर, मुन्ना गोंगले, निकेश कामीडवार, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलट्टीवार, जावेद खान, परशुराम निकुरे, मारोती मेश्राम, किशोर भरडकर, किशोर निकुरे, अरुण कांबळे, गणपत पेंदाम, मनोहर चचाने,विलास घोंगडे, पुरुषोत्तम जेंगठे, संतोष तिमाडे, रामदास कुकडका, मोरेश्वर भांडेकर, बेपारी सर, ऍड. गयानी, पांडुरंग भांडेकर, निलेश गुरनुले, राजेंद्र गोहने, गिरीधर सिडाम, अनुप कोहळे, यांचे सह विविध गावांतील शेतकरी प्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

