मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809
विशेष म्हणजे वयाच्या 28 व्या वर्षी त्यानी phd पूर्ण केले
तसेच आठ रिसर्च पेपर हे स्कोपस सूची मध्ये असून त्याना दोन वेळा आंतराष्ट्रीय कॉन्फन्स मध्ये बेस्ट रिसर्च पेपर अवार्ड ने सन्मानीत केले
झांसी उत्तरप्रदेस. तेलंगणा येथील विशाखा पटनम
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील नेहा साहेब खान पठाण यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत अवघ्या तीन वर्षांत पीएचडी पूर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे अहेरीसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेहा पठाण यांचा पीएचडीचा व्हायवा झाला असून त्यांचा संशोधन विषय होता –
“विविध सॉल्व्हेंटमध्ये अमिनो आम्लांचे थर्मो-अकॉस्टिक आणि ट्रान्सपोर्ट गुणधर्मांचा अल्ट्रासोनिक प्रोबच्या सहाय्याने अभ्यास”
हा विषय भौतिकशास्त्राशी संबंधित असून संशोधन अत्यंत तांत्रिक आणि महत्त्वपूर्ण मानला जातो.
नेहा यांनी आपले संशोधन गोंडवाना युनिव्हर्सिटी अंतर्गत पूर्ण केले असून सरदार पटेल महाविद्यालयात , चंद्रपूर येथील संशोधन केंद्रात त्यांनी हे कार्य यशस्वीरित्या पार पाडले. त्यांच्या संशोधनाला मार्गदर्शन Dr. उर्वशी P. माणिक यांनी केले असून त्या सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्य देखील आहेत.
गडचिरोली जिल्हा हा नक्षलप्रभावित म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत शिक्षण घेणे आणि उच्च शिक्षणापर्यंत पोहोचणे हे मोठे आव्हान असते. त्यातच अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत नेहा यांनी हे यश मिळवले, ही बाब विशेष कौतुकास्पद आहे. त्यांनी अनेक अडचणींवर मात करत आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने पीएचडी पूर्ण केली.
अहेरीसारख्या दुर्गम भागातील मुलीने एवढे मोठे यश मिळवणे हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नेहा पठाण यांच्या या यशामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी नवी दिशा मिळणार आहे.
