मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी:- तालुक्यातील पेरमिली येथील गावात धार्मिक व सामाजिक एकतेचा नवा अध्याय सुरू करत ‘श्री राम रक्षा हनुमान सेवा समिती’ची नुकतीच उत्साहात स्थापना करण्यात आली.
या समितीच्या स्थापनेमुळे परिसरातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांना चालना मिळणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनिवास बंडमवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सुरज सेनगारपवार, सचिव म्हणून रघुनाथ औतकर तर सहसचिव म्हणून सचिन सिदमशेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कोषाध्यक्षपदी तुळशीराम चंदनखेडे, सहकोषध्यक्ष डॉ. लक्ष्मण विश्वास यांची निवड करण्यात आली आहे.
समितीच्या सदस्यपदी सत्यनारायण येगोलापवार, रामरेड्डी बंडमवार, डॉ. उत्पलकुमार विश्वास, पंकज येगोलपवार, सत्यनारायण चंदनखेडे, कन्हाई मंडल, राजीव बोमनवार , प्रफुल ढोंगे, रजनीकांत येगोलापवार, मोरेश्वर चंदनखेडे, पिंटू विश्वास, रामचंद्र गट्टूवार, सनथ चंदनखेडे, रितिक मडावी, ताराचंद मिस्त्री, कवीश्वर चंदनखेडे, सचिन सडमेक, मुकेश सडमेक, विनायक येगोलपवार, गजानन मडावी, मनीष बाचाळ, आकाश सेनगारपवार, विनोद नारायण मडावी, आर्यन मुडावार, देवानंद चंदनखेडे, अमित औतकर, आकाश औतकर, संदीप मडावी, तिरुपती कत्तीवर, विनोद औतकर, तिरुपती कोसरे, रुपेश हजारे यांची निवड करण्यात आली आहे.
महिला सदस्य म्हणून पूजा चंदनखेडे, जयाताई औतकर , सत्यताई येणपरेड्डीवार, प्रियंका ढोंगे, पौर्णिमा सिदमशेट्टीवार, सपना बंडमवार, रजिता मुळावर, रूपाली चंदनखेडे, शकुंतला पडालवार, सविताताई चंदनखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ही समिती भविष्यात विविध धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि जनकल्याणकारी कार्य राबविण्यासाठी सक्रियपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

