मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी:-* पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६ अंतर्गत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी शनिवारी अहेरी येथील माता कन्यका मंदिर येथे करण्यात आले आहे. समाजकार्य, संघटन कौशल्य आणि विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण वर्गामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारधारेवर मार्गदर्शन करण्यात येणार असून अंत्योदयाच्या संकल्पनेवर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न समजून घेत विकासाच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घ्यावे, याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.कार्यक्रमात विविध मान्यवर मार्गदर्शक उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी या प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.!
सदर प्रशिक्षण वर्गामुळे कार्यकर्त्यांना नवीन दिशा व प्रेरणा मिळेल.
