कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजसेक नारायण चालूरकर यांचे हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809
अहेरी तालुक्यातील राजाराम जवळील खांदला येथे संविधानाने जनक, परमपूज्य, दलितांचे कैवारी, महामानव डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती मोठया ताठामाठात साजरा करण्यात आले. या वेळी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषण देण्यात आले. या वेळी उपस्थित आयु,सामाजिक कार्यकर्ते वंदना अलोणे,आरोग्य सेविका स्वाती मॅडम, आरोग्य सेवक, मयूर मेश्राम,ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, पी. पी. झाडे उपस्थित होते तर गावातील नागरिक संतोष झाडे, विक्रम दुर्गे, सुजाता दुर्गे, संजना दुर्गे, मंजुळा दुर्गे, संगीता दुर्गे, शारदा झाडे, राजेश गोवर्धन, सुरेंद्र गोवर्धन, आदी बौध्द उपासक, उपासिका मोठया प्रमाणात उपस्थित होते.

