माजी सभापती भास्कर तलांडे यांची मागणी.
मधुकर गोंगले, उपसंपादक. मो. नं. 9420751809.
राजाराम परिसरातील खान्दला, चिरेपली पत्तीगाव, मरनेली, गोलाकरजी, आदि. गावातील शेतकरी सन 2025-26 या हंगामात शेतकरी बांधव तांत्रिक अडचणी मुळे पीक पाहणी केली नाही, त्यामुळे शेतकयांना या हंगामात बँकेकडून कर्ज नाकरण्यात येत आहे.
त्यामुळे आपल्या स्तरावरून पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्याच्या सात-बात वर सन-2025-26 शेरा करुन पीक पाहणी झाली आहे असे सात-बारा तलाठी कडून देण्यात यावी. अशी मागणी अहेरीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांनी अहेरीचे नायब तहसिलदार श्री. दाते साहेब यांना निवेदन देवून केली आहे. यावेळी श्री. सदू पेंदाम, सुरेश मोत्तकुरवार, मुत्ता पोरतेट, सतीश सडमेक, शामराव पैदाम, येण्का पेंदाम, येण्का गावडे, बिच्चू सडमेक, परदेशी सडमेक, सोमा कोडापे, सुभाष सिडाम, शेवता सिडाम, आदि उपस्थित होते.

