मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशनभाऊ कंबगौनिवार यांचा आज वाढदिवसाच्या औचित्यसाधून समाजसेवेचे भान लक्ष्यात घेऊन स्वत: केक न कापता गरजू निराधार माता भगनींना तसेच निराधार पितांना वस्त्रधान करण्यात आले आहे.यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्करभाऊ तलांडे तसेच सामाजिक कार्यकर्ते जितुभाऊ पंजलवार, राकेश तलांडे, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले,ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संजुभाऊ पोरतेट, राम जुमडे आदी निराधार गरजूना वस्त्रदान करताना उपस्थित होते.नेहमीच समाज कार्यक्रम राबवत असतात या वाढदिवसाच्या निमित्तने अंत्यत गरजू लोकांना वस्त्रधान करून एक वेगळी उपक्रम केले. असल्यामुळे गरजू लोकांनी त्याचे पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन केले असून सर्वकडून कौतुक केले जात आहे.
