मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
खादला : सेवाच आमचा धर्म या उक्तीप्रमाणे अहेरी विधानसभा क्षेत्रात सतत गरजूंच्या मदतीला धावून जाणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले आहे.अहेरी तालुक्यातील राजाराम जवळील खादला येथील कॅन्सरग्रस्त गरीब रुग्ण मोरेश्वर जयराम बामनकर यांच्या कुटुंबाला त्यांनी औषधोपचारासाठी तातडीने आर्थिक मदत केली आहे.
खादला येथील रहिवासी मोरेश्वर जयराम बामनकर,वय 45 वर्षे,गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सर या दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना बाहेरगावी मोठ्या रुग्णालयात जाऊन उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नव्हते.रोजंदारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या बामनकर कुटुंबापुढे उपचाराचा खर्च कसा सोसायचा ,हा मोठा गंबीर प्रश्न उभा राहिला होता.पैशाअभावी मोरेश्वर यांच्यावरील उपचार थांबण्याची वेळ आली होती.
मोरेश्वर बामनकर यांची पत्नी सविता मोरेश्वर बामनकर,मुलगा प्रविण मोरेश्वर बामनकर यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक, समाज क्षेत्रात कार्य करणारे.सुरेश पेंदाम यांना सोबत घेऊन आज डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.यावेळी त्यांनी मोरेश्वर यांची संपूर्ण परिस्थिती व आजाराचे गांभीर्य डॉ.अजयभाऊंना कथन केले.भाऊ आमच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत.तुम्हीच आमचा आधार आहात,अशी आर्त हाक सविता बामनकर यांनी घातली.
बामनकर कुटुंबाची कैफियत ऐकताच डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना धीर दिला.कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेत त्यांनी मोरेश्वर बामनकर यांच्या पुढील औषधोपचारासाठी तात्काळ आर्थिक मदत केली.पैशाअभावी कोणाचाही उपचार थांबता कामा नये.तुम्ही काळजी करू नका,उपचार सुरू ठेवा.मी तुमच्या पाठीशी आहे,असा विश्वास डॉ.अजयभाऊंनी यावेळी कुटुंबाला दिला.
यावेळी बोलताना डॉ.अजयभाऊ कंकडालवार म्हणाले,मोरेश्वर बामनकर हा केवळ एक रुग्ण नाही,तर तो आपल्या अहेरी तालुक्यातील,आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे.त्याच्या दुःखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे.राजकारण बाजूला ठेवून प्रत्येक गरजूच्या मदतीला धावून जाणे हीच खरी समाजसेवा आहे.बामनकर कुटुंबाने खचून न जाता धीराने संकटाला सामोरे जावे.पुढील उपचारासाठीही जे सहकार्य लागेल ते करण्यास मी तयार आहे.
डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी केलेल्या या माणुसकीच्या मदतीमुळे बामनकर कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.त्यांनी डॉ.अजयभाऊंचे आभार मानले.या घटनेमुळे खादला गावासह संपूर्ण परिसरातून डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.अडचणीच्या काळात हक्काचा माणूस धावून आला,अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ.अजयभाऊ कंकडालवार हे आरोग्य शिबिरे,रुग्णांना आर्थिक मदत,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य अशा विविध माध्यमातून समाजसेवेचा वसा अविरतपणे जपत आहेत.

