मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
भामरागड ==
भामरागड तालुक्यातील
येचली,बामणपली,मन्नेराजाराम बस सेवा
गेल्या दहा दिवसापासून
बस बंद असल्यामुळे
शाळकरी विध्यार्थ्यांना, शासकीय कामानिमित्त व दवाखान्यात जाण्यासाठी या परिसरातील नागरिकांना खूप अडचण होत असल्याने बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी कारण आलापल्ली भामरागड जाणारे अनेक प्रवासी असतात त्याच्यामुळे बसची अत्यन्त आवश्यक आहे. तसेच लोकबिरादार या हॉस्पिटलमध्ये जाणारे अनेक लोक आहेत त्यांना खूप त्रास होत असल्याने बस तात्काळ सुरू करण्यात यावा दररोज ये-जा करण्याऱ्याची खूप मोठी गर्दी असते.या सर्व बाबी लक्ष्यात घेऊन बस सेवा सुरळीत करण्यात यावी अशी मागणी समाजसेवक भीमराव वनकर यांनी पत्रकातून केली आहे.
