पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे : १) सराईत आरोपीकडुन ४ मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६३४ / २०२२ मादंवि कलम ३९२.५०६, ३४, महाराष्ट्र
पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) १३५ अन्वये या गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सचिन गाडे व राहुल तांबे यांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे अब्दुल महंमद शेख, रा. कात्रज, गुजरवाडी भारतनगर, पुणे यांनी केला असुन तो सध्या भारतनगर, गुजरवाड़ी येथे थांबला आहे. लागलीच तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि अमोल रसाळ, पोउनि धिरज गुप्ता व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी रेकॉर्डवरील आरोपी अब्दुल महंमद शेख, रा. कात्रज, गुजरवाडी, भारतनगर, पुणे यास भारतनगर, गुजरवाडी येथून ताब्यात घेवून त्याचेकडुन नमुद गुन्हयातील चोरी केलेला मोबाईल फोन जप्त करुन त्यास नगुद गुन्हयामध्ये दिनांक २८/०९/२०२२ रोजी अटक करण्यात आला आहे. आरोपीताची मा. न्यायालयातून पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्याचेकडे आणखीन तपास करता त्याने आणखीन ४ मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली देवुन ते मोबाईल फोन निवेदन पंचनाम्याने जप्त करण्यात आले असुन त्याप्रमाणे खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
- २. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६३९ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६३८ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे ३. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६३६ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे वरीलप्रमाणे आरोपीताकडुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील १ जबरी चोरीचा व ३ मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडुन ६१,५००/- रुपयांचे ५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.
(२) जबरी चोरी करुन खुनाचा प्रयत्न करणा-या रेकॉर्डवरील आरोपीच्या भारती विद्यापीठ पोलीसांनी सोलापुर येथुन मुसक्या आवळल्याबाबत..
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६४२ / २०२२ भादंवि कलम भादंवि कलम ३०७, ३९४,५०४, ५०६, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) १३५. भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५. क्रिमीनल अर्मेन्टमेंट अॅक्ट कलम ७ या गुन्हयातील आरोपी खाश्या ऊर्फे कासीम बाबुलाल शेख याचा तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि अमोल रसाळ, पोउनि धिरज गुप्ता व पोलीस अंमलदार हे शोध घेत असताना आरोपी नळदुर्ग, उस्मानाबाद येथे असल्याचे तांत्रिक विश्लेषणावरुन पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे यांने निष्पन्न झाल्याने लागलीच वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मितेश चोरमले यांना आरोपीताचा शोध घेणे कामी उस्मानाबाद, नळदुर्ग येथे रवाना केले होते. त्यानुसार त्यांनी नळदुर्ग, उस्मानाबाद येथे जावुन आरोपी खाश्या ऊर्फे कासीम बाबुलाल शेख, रा. गुजर वाडी फाटा, जाधवनगर, पुणे याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन त्याचेकडे तपास करता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास गुन्हयामध्ये त्यास अटक केली आहे.
३) जबरी चोरी करणारे आरोपीकडून चोरीचा मोबाईल हस्तगत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६४६ / २०२२ भादवि कलम ३९२ अन्वये गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि अमोल रसाळ, पोउनि धिरज गुप्ता व तपास पथकातील पोलीस अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे व अभिनय चौधरी यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा मोबाईल चोरून नेणारा आरोपी हा लाल रंगाचे गाडीवर स्वामीनारायण मंदीर शेजारी पार्किंग मध्ये थांबलेला आहे. त्याने दाढी मिशा वाढविलेल्या असून अंगात लाल काळया रंगाचा चेक्सचा शर्ट व निळे रंगाची जीन्स पॅन्ट आहे, अशी बातमी मिळाल्याने लागलीच मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बहीरट सो यांचे मार्गदर्शन व सुचनांनुसार तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंगलदार यांनी स्वामीनारायण मंदीर येथे सापळा रचुन आरोपी सनी शंकर कांबळे, वय २७ वर्षे, रा. स.नं.३ अमोल भिंताडे बिल्डिंग, प्रभात सोसायटी जवळ, तळजाई पठार पुणे यास गुन्हया मध्ये अटक करुन त्याचे कडुन चोरी केलेला मोबाईल, बॉक्सर कंपनीची दुचाकी जप्त केली आहे.
४) वाहन चोरास अटक करून त्याचेकडुन दुचाकी गाडी जप्त केलेबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६६४ / २०२२ भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हयातील
अज्ञात आरोपीताचा तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि अमोल रसाळ, पोउनि धिरज गुप्ता व तपास पथकातील पोलीस अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले व सागर बोरगे यांना सदर गुन्हयातील चोरीस गेलेली पल्सर दुचाकी गाडी, तिचा नंबर MH / 12 / RB / 6506 ही इसम नामे शुभम विलास भगत, रा. जिजाबा चव्हाण चाल, धनकवडी गावठाण, पुणे हा वैभव चिकन सेंन्टर समोरील श्री साई चौकाजवळ, आंबेगाव पठार, पुणे या ठिकाणी घेवून थांबला आहे. लागलीच तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन आरोपी शुभम विलास भगत, वय-२० वर्षे, रा. जिजाबा चव्हाण चाळ, धनकवडी गावठाण, पुणे यास ताब्यात घेवुन तपास करता त्याने गुन्हयाची कबुली दिली असुन त्याचेकडुन चोरी केलेली दुचाकी गाडी जप्त केली आहे.
सदरची कारवाई श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग श्री.सागर पाटील पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, श्रीमती सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, अतिरीक्त कार्यभार श्री. आर. एन. राजे, सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे), विजय पुराणिक, सहा पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, गणेश भोसले, रविंद्र चिप्पा, नरेंद्र महांगरे, विश्वनाथ घोणे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले अभिनय चौधरी, राहुल तांबे, मितेश चोरमले, विक्रम सावंत, अशिष गायकवाड, सागर बोरगे यांच्या पथकाने केली

