पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
दत्तवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे : दिनांक ०८/१०/२०२२ रोजी दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीत जनता वसाहत परिसरामध्ये इसम नागे अक्षय रावडे रा. धायरी पुणे याचा धारधार कोयत्याने डोक्यात व हातावर वार करुन खुन झाला होता त्याबाबत दत्तवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २३२ / २०२२ भा.द.वि कलम ३०२, ३४ आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे…
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली दाखल गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अधिकारी चंद्रकांत कामते व तपास पथकातील पो अम अमित सुर्वे व अमोल दबडे, प्रमोद भोसले यांना त्यांचे खास बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की. दि. ०८/१०/२०२२ रोजी रात्री ०२/३० वा. चे सुमारास इसमनामे अक्षय रावडे या रिक्षाचालकाचा कोयत्याने मारहाण करुन खुन करणारे तीन इसम दांडेकर पुलाखाली थांबलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभय महाजन व पोनि गुन्हे श्री विजय खोमणे यांना कळविली असता त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करून तपास पथकाच्या दोन टीम तयार करुन पुढील कारवाई करण्याचे सांगितले,
त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व स्टाफ असे दांडेकर पुलाचे दोन बाजुस दोन टीम पाठवून सदर ठिकाणी तीन इसम थांबलेले दिसले त्यांनी पोलीसांना पाहताच तेथुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असताना अत्यंत शिताफिने त्या तीन इसमांना जागेवरच पकडुन त्यांना त्यांची नाव पते विचारता त्यांनी त्यांची नावे १) विनोद वामन आल्हाट, वय ३७ वर्षे २) अनिकेत बाळु नांगरे, वय २४ वर्षे, ३) आकाश संतोष देवरुखे, वय २६ वर्षे तिघेही राहणार सर्व्हे नं १३०, दांडेकर पुल, दत्तवाडी पुणे अशी असल्याची सांगितले. त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुशंगाने अधिक तपास करता त्यांनी त्यांचा मित्र नाम अक्षय रावडे हा आरोपींना तुम्ही दारु पिवुन संपलेला आहे, तुमच्यात काही दम नाही राहीलेला तुम्ही काय करु शकत नाही असे बोलल्याने झालेल्या किरकोळ वादातून मयत अक्षय रावडे यास दुचाकीवर जनता वसाहत कॅनॉल रोड परिसरामध्ये घेवुन जावुन त्याचे डोक्यात व हातावर लोखंडी कोयत्याने वार करुन खुन केल्याचे कबुल केले आहे. नमुद आरोपींना गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या एक तासांमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. दाखल गुन्हयांचा पुढील तपास सहा. पो.नि. श्री युवराज पाटील, दत्तवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप-आयुक्त परि. ३ श्रीमती पौर्णिमा गायकवाड मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग श्री. सुनिल पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अभय महाजन व पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक चंद्रकांत कामते, किशोर तनपुरे, पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, दयानंद तेलंगे-पाटील, पुरुषोत्तम गुन्ला, अमोल दबडे, अनिस तांबोळी, प्रमोद भोसले, किशोर वळे, ज्ञानेश्वर शिंदे, अमित चिव्हे, प्रशांत शिंदे आणि सद्दाम शेख यांनी केली आहे.