श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बीड मधील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष भगिरथ बियाणी यांनी स्वता:जवळील बंदुकीने डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली. ही घटना आज सकाळच्या सुमारास बीड शहरातील एमआयडीसी भागातील बियाणी यांच्या राहत्या घरी घडली. बियाणी यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष भगिरथ बियाणी मागील अनेक वर्षापासून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. सोमवारी रात्री आपल्या परिवराबरोबर रात्री उशिरापर्यंत त्यांनी गप्पा मारल्या. नंतर ते आपल्या खोलीत जावून झाेपले. पहाटेच्या सुमारास उशिरापर्यंत दरवाजा उघउला नसल्याने परिवाराने पाहिले तर बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तात्काळ बीड शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
बियाणी यांच्या मृत्यूची डॉक्टरनी घोषणा केल्या नंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी बीड जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती समजताच खा.प्रीतम मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्यासह शेकडो, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली. रूग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला होता. आत्महत्या करण्या मागचे कारण काय? याचा तपास पोलीस करत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या.9766445348/7385445348