वंचित बहुजन माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट व जनरल युनियनचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय गुदगे व संपर्क प्रमुख प्रशांत वाघमारे यांची पत्रकार परिषदेत माहिती…
सांगली जिल्हा प्रतिनिधी
सांगली:- अनेक वर्षाच्या प्रतीक्षेत बांधकाम कामगारास वर्षातून एकदा येणारा दिवाळी सण साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबाला नवीन कपडे घेणे, गोडधोड पदार्थ करणे व आनंदोस्तव उत्साहाने साजरी करण्यासाठी यंदा तरी महाराष्ट्र शासनाने नोंदीत कामगारांना १०,००० रुपये दिवाळी बोनस जाहीर करून दिवाळीच्या अगोदर प्रत्येक कामगाराच्या खात्यावर जमा करून आर्थिक मदत १४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत द्यावी अन्यथा १७ ऑक्टोबर २०२२ रोजी कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांच्या सांगलीतील घरावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय गुदगे व संपर्क प्रमुख प्रशांत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पत्रकार परिषदेस संबोधित करताना संपर्क प्रमुख प्रशांत वाघमारे म्हणाले, २०१४ नंतर बंद केलेली मेडिक्लेम योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, कोल्हापूर जिल्ह्यासाठी पूर्णवेळ सहाय्यक कामगार आयुक्त यांची नेमणूक करण्यात यावी, बांधकाम कामगारांना ६० वर्ष पूर्ण झाल्या नंतर दरमहा ५००० रुपये पेन्शन सुरू करावी, कामगारांच्या वयोगटातील अट काढून टाकावी व सर्व वयोगटातील कामगारांचा मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना २ लाख रुपये मिळालेच पाहिजेत या आमच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात. यावेळी गणेश कुचेकर, समाधान बनसोडे, संजय कांबळे, लक्ष्मण सावरे, फरजाना नदाफ, भारत कोकाटे आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व चालू घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

