✒️प्रशांत जगताप
नागपूर: – मराठी चित्रपटसृष्टीत आज वेगवेगळे प्रयोग होत आहेत. याच पार्श्वभूमीवर यशवंत या आगामी चित्रपटाचे प्रमोशनसाठी चित्रपटातील मुख्य अभिनेता नितीन मनोहरे आणि कॉस्ट्यूम डिजाइनर सुप्रिया ढोके घेत आहे. यशवंत चित्रपटाची टीम वेगवेगळ्या ठीकाणी जाऊन या चित्रपटाचे प्रमोशनसाठी मेहनत घेत आहे. काही दिवसापूर्वी नागपूर शहरातील प्रसिद्ध अशा चक्क ग्रॅण्ड रास गरबा नृत्य स्पर्धेत या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले होते. हा अदभुत असा सोहळा या वेळी नागपूरच्या आशीर्वाद एनआयटी गार्डन झिंगाबाई टाकळी, गोधनी रोड नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी यशवंत चित्रपटातील मुख्य अभिनेता नितीन मनोहरे आणि या चित्रपटाचे कॉस्ट्यूम डिजाइन करणाऱ्या नागपूर येथील प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिजाइनर सुप्रिया ढोके यावेळी उपस्थित होत्या.
जिजामाता बहुउददेशीय जनकल्याण शिक्षण संस्था अध्यक्ष ॲड. स्नेहल ठाकरे आणि सचिव बंडूभाऊ ठाकरे द्वारा नवरात्री निर्मित आयोजित ग्रॅण्ड रास गरबा नृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहापूर्ण वातावरणात सुरू असताना यावेळी आगामी बहुचर्चित मराठी चित्रपट यशवंत याचे प्रमोशन करण्यात आले. याला मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळला त्यामुळे आता या चित्रपटाची सर्वांना बघण्याची हौस लागली आहे.
विदर्भातील प्रसिद्ध अवलिया संत श्री यशवंत माऊली यांच्या जीवन कार्यावर आधारित यशवंत या मराठी चित्रपटामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री स्मिता तांबे, आदित्य हळवे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. संत यशवंत माऊली याची भूमिका वरूड येथील नितीन मनोहरे यांनी साकारली आहे. या चित्रपटात जवळपास 120 कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहे. या चित्रपटाची कथा अजय देशपांडे यांनी लिहिली असून दिग्नदर्शन पियूष विजय यांनी केले आहे.
या चित्रपटातील प्रत्येक घटकामध्ये, मग ते कथेपासून लोकेशन्स असो किंवा संगीतापासून सीन ट्रीटमेंटपर्यंत, प्रत्येक बाबतीत वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात अभिनेता नितीन मनोहरे यांनी सांगितले की, मराठी चित्रपटसृष्टीत आज वेगवगेळे प्रयोग होत आहेत. आपण कल्पकतेच्या बाबतीत कुठेही मागे नाही. मायबाप रसिक प्रेक्षकालाही नवे काहीतरी दिले तर तो त्या कलाकृतीचे भरभरून स्वागत करतो. त्याच्या अनुषंगानेच चित्रपट तयार करण्यात आला आहे. त्यासाठी पूर्ण टीमने मेहनत घेतली आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रमोशनही वेगळ्या पद्धतीने करीत आम्ही रसिकांसमोर चित्रपट आणत आहोत. येत्या काही दिवसात चित्रपट पूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.
सुप्रिया ढोके यांनी केलं कॉस्ट्यूम डिझाईन.
गेली अनेक वर्षे फॅशन जगतात आपले नाव कोरणारी नागपूरची मराठमोळी फॅशन डिझायनर सुप्रिया ढोके यांचा हा 6 वा चित्रपट असून त्यांनी या चित्रपटातील सम्पूर्ण कलाकारांचे कॉस्ट्यूम डिझायन केलं आहे. ‘यशवंत’ या मराठी चित्रपटाचे सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांनी मार्गदर्शन तर अभिनेत्री स्मिता तांबे यांनी सुप्रिया ढोके च्या कामा ची स्तुती केली ती सुप्रियासाठी खूप आंनदाची बाब असून तिच्या आगामी चित्रपटा करीता तिला या मार्गदर्शनाचा आणि यशवंत या चित्रपटा चा अनुभव हा नक्कीच उपयोगी असणार म्हणून त्यांनी सांगितल. तसेच चित्रपट हा प्रत्येक वयोगटाकरिता व्यक्ती करिता आहे त्यामुळे हा चित्रपट आपण आपल्या संपूर्ण परिवारा बरोबर बघावा अस यावेळी सुप्रिया ढोके यांनी म्हटल आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348