१५ ऑक्टोबर २०२२ ला जातीनिहाय जनगणना परिषद दादर माटुंगा येथे आयोजित.
✒️रुपसेन उमराणी, मुंबई ब्यूरो चीफ
मुंबई:- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असूनही समाजाला पूर्ण न्याय मिळायचा अजून बाकी आहे. भारत देश स्वतंत्र झाता त्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत नुकताच आपण सर्वांनी स्वांतत्र अमृत महोत्सव साजरा केला मागील ७७ वर्षातील सामाजिक बदल आणि आर्थिक विकासाच्या वाटचालीचे मुल्यमापन करत असताना मागास समाज घटकांमध्ये नेमका कोणत्या प्रकारचा विकास झाला आहे. तसेच मागास समाजातील अशक्त घटक ओळखुन त्यावर विषेश लक्ष केंद्रित करून त्या समाजाला सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या मागासवगीय घटकांची जनगणना होणे आवश्यक होते.
ओबीसी समाजाच्या सामाजिक विकासासाठी आजपर्यंत १९३१ रोजी करण्यात आलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या आकड्यावर अवलंबून राहावे लागत आहे. देशाची लोकसंख्या अंदाजे १४० कोटीच्या वर असताना त्या लोकसंख्येच्या अध्यापिक्षा जास्त संख्या असणार्या समाजाची नेमकी संख्या किती आहे. हेच आजपर्यंत माहीत नाही अशा वेळेला सामाजिक न्यायाच्या लढ्यात हा वर्ग कायम दुर्लक्षित अपेक्षित आणि तंचित रहात आहे.
जोपर्यंत ओबीसी समाजाची खरी संख्या कळत नाही तोपर्यंत सामाजिक विकासाचे धोरण न्यायीक पद्धतीने आखता येणे अशक्य आहे. बजेट मध्ये ओबीसी समाजासाठीची तरतूद अगदीच तोंडाला पाने पुसल्या सारखी असते. देशाच्या उन्नतीसाठी हा बहुसंख्येने असणारा वर्ग विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. ओबीसी समाजाची तसेच सर्व भारतीय समाजाची जातीनिहाय जनगणना होणे खुपच गरजेचे आहे. हाच डेटा सरकारला नियोजनासाठी उपयोगी पडणार आहे. याच भूमिकेसाठी ओबीसी एकीकरण समितीच्या माध्यमातून दादर माटुंगा कल्चरल हॉल येथे जातीनिहाय जनगणना परिषद दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं, ४ ते ९ वा पर्यंत घेण्यात येणार आहे.
याच परिषदेतच औचित्य साधून ओबीसी नायक विशेषांक प्रकाशित करण्यात येणार आहे. या प्रयत्नांना आपल्या मौल्यवान सहकार्याची अपेक्षा आहे. आपणाकडून शक्य होईल तेवढी मदत करण्यात यावी. तसेच ओबीसीनायक या विषेशांकाता जाहिरातीच्या स्वरूपात सहकार्य करावे ही अशी विनंती प्रसिध्दी साठी दिलेल्या परिपत्रकात करण्यात आली आहे.
ओबीसी समाजाच्या ही परिषद यशस्वी करण्यासाठी या आंदोलनाचे (संयोजक) संतोष आंबेकर, नितीन आंधळे, संजय नार्वेकर, पुनम काळे, कृपाशंकर यादव, अमित पेडणेकर, प्रितेश पवार, सखाराम शिरोडकर, नरेंद्र मोरे हे मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

