दिलीप दहागांवकर, धाबा तोहोगावं प्रतिनिधी
गोंडपिपरी:- तालुक्यातील करंजी धनापुर चेकबोरगाव शेतशिवरात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आल्यानंतर त्यावरून या परिसरात पुन्हा वाघाचे अस्तित्व दिसले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील शेजारच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहे. वन विभागाने देखील वाघाच्या पायाच्या खुणा दिसलेल्या परिसरात गस्त वाढवलेली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी धनापुर चेकबोरगाव शिवारात गुरुवारी वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांत दहशत पसरली आहे. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. गावकरी कामानिमित्त शेतात गेले असता त्यांना वाघाचे पगमार्क आढळून आले त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, नागरिक प्रचंड धास्तावले आहे. या परिसरात वाघाचे पगमार्क असल्याची माहिती झाडे यांनी वनविभागाकडे दिली. त्यानंतर वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक बुराडे, वनरक्षक पांढर यासह चेकबोरगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गौतम झाडे यांनी सदर क्षेत्राची पाहणी केली. या परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकांना सावध राहण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

