देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
नागपूर:- जिल्हातील वनाडोंगरी नगर परिषद अंर्तगत प्रभाग क्र. 7 मधे पिण्याच्या पाण्याची टाकि असून या टाकीचे पाणी प्रभाग क्र. 6, 7 व 8 मधील रहिवाशांना पुरविन्यात येते. या टाकीची ऊंची कमी असल्यामुळे कोणतीही व्यक्ति, मोकाट जनावरे टाकिवर चढतात, परिणामी कचरा, घाण टाकिमधे जात असते. टाकीच्या आजुबाजुला डुकरांची रेलचेल नागरिकांना बघायला मिळतात. अस्वछ पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत असल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येवू शकते.
समस्येवर तोड़गा काढण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या टाकिला फ़िल्टर प्लांट संयंत्र व टाकिला सुरक्षा भिंत करावी या मागणीसाठी आम आदमी पार्टी, वानाडोंगरी कडून मुख्याधिकारी, नगर परिषद, वानाडोंगरी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टी, वानाडोंगरी चे पदाधिकारी अतुल डाखले, मुकेश गौतम, रितिक बोदिले, ऋषिकेश मुळे, शुभम धोटे, पिंटू मते, प्रा. भास्कर रासेकर, हेमंत शेगेकर,सुरज आप्तूरकर,आशिष डाखळे रवि उईके इत्यादी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348