विश्वास वाडे, चोपडा तालुका प्रतिनिधी
जळगाव:- जिल्हातील अमळनेर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अमळनेर शहर तलाठी गणेश राजाराम महाजन वय ४६ वर्ष व मंडल अधिकारी दिनेश शामराव सोनवणे वय ४८ वर्ष या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत दिड लाख रूपयांची लाच स्विकारताना आज दि.१३ रोजी ताब्यात घेतले. त्यामुळे संपूर्ण जिल्हातील प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
अमळनेर शहरातील मंडल अधिकारी व तलाठी या दोन महसूल कर्मचारी यांनी फिर्यादी कडून दोन लाख रूपये लाच मागीतली यात तडजोड करत दिड लाख रूपये देण्याचे ठरले, ते लाचेचे पैसे घेताना रंगेहाथ जाळ्यात सापडले.
तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे 3 डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर क्रं.MH18 AA 1153 हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे 2 महिन्यापुर्वी तहसिल कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आलेले होते. सदरचे डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे क्रं.1 व 2 यांनी पंचासमक्ष 1,50,000 रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम 1,50,000 रुपये आरोपी क्रं.1 यांनी तलाठी कार्यालय अमळनेर येथे पंचांसमक्ष स्वीकारली असता दोघं संशयीतांना अटक केली.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस अधिकारी एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी यांनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

