पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
कोथरुड पोलीस स्टेशन पुणे शहर
त्यांचेकडुन एकुण ०६ गुन्हे उघड दि. ०८/१०/२०२२ रोजी तपास पथक प्रभारी पी.व्ही. कुलकर्णी हे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांचेसह हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना शास्त्रीनगर येथून एक व्यक्ती संशयित स्थितीत दुचाकी घेवून जात
असताना दिसला. त्यामुळे त्याचेवर संशय बळावल्याने स्टाफचे मदतीने ताब्यात घेवून दुचाकी वाहनाबाबत
विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. सदर दुचाकीवरील इसमांविरुध्द अधिक संशय बळावल्याने कोथरुड पो स्टे येथे आणून त्याचेकडे चौकशी दरम्यान त्याचे नाव संतोष सुरेश यादव, वय-३८ वर्षे, रा. ८२ / ६ प्लॉट नं.६ सिध्दी विनायक कॉलनी शास्त्रीनगर कोथरुड, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे मिळून आले दुचाकी क्र एम एच पर आरजे ८७६२ बाबत गुन्हे अभिलेखाची पडताळणी करता, कोथरूड पोलीस ठाणेस गु.र.नं. २३२ / २०२२ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निदर्शनास आले. सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास गुन्ह्यात अटक करून केले तपासामध्ये आरोपी हिंजवडी परिसरातून दुचाकी वाहने स्वतःच्या मौजेसाठी चोरी करून पेट्रोल संपले नंतर सोडून दिल्याचे निष्पन्न झाले आरोपी कडून१,००,०००/- रु. किंमतीचे ४ दुचाकी वाहने (२ स्प्लेन्डर अॅक्टिव्हा अॅक्सेस) जप्त करण्यात आली असून खालीलप्रमाणे पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत पो स्टे येथील दाखल वाहन चोरीचे एकूण ०६ गुन्हे उघड झाले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, श्रीमती पौर्णिमा गायकवाड यांचे अधिपत्याखाली गा. सहायक पोलीस आयुक्त, श्रीमती रुक्मिणी गलंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक, (गुन्हे). बाळासाहेब बडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पी. व्ही. कुलकर्णी व त्यांचे पथकातील अंमलदार अजिनाथ चौधर, योगेश सुळ, संजय दहिभाते, आकाश वाल्मिकी, विष्णु राठोड, अजय शिर्के, शरद राऊत, शितकाल, शेळके यांनी सदरची उत्कृष्ट कामगिरी केली आहे..

