✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- जील्हातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. एक माता आपल्याच पोटच्या मुलासाठी वैरणी झाली. एका प्रेमी युगलाने प्रेमविवाह केला. विवाहानंतर काही महिन्यांतच पती-पत्नीच्या नात्यात वाद निर्माण झाले. या वादातून राग अनावर झाल्याने जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या अकरा महिन्यांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केला. ही संतापजनक घटना नागपूर जिल्हातील टाकळघाट शहरात उघडकीस आली. सारांश पंजाब पाटेकर असे हत्या करण्यात आलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या प्रकरणी टाकळघाट पोलिसांनी आरोपी महिला एकता पंजाब पाटेकर वय 27 वर्ष हिला आपल्याच मुलाच्या हत्येचा आरोपात अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, टाकळघाट येथील शिक्षक कॉलनीत पंजाब पाटेकर हे आपल्या पत्नी एकता बरोबर पाच महिन्यांपासून भाड्याने राहत आहे. पंजाब हे इंडोरामा कंपनीमध्ये कामाला आहेत. एकता ही गृहिणी आहे. तीन वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता. दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. घटनेच्या दिवशी चिमुकल्याला पाळण्यामध्ये झोपवून एकता घरची धुणी-भांडी करीत होती. पंजाब घरी झोपलेले होते. धुणी-भांडी आटोपून एकता खोलीमध्ये आल्यावर तिला मूल पाळण्यात न दिसल्याने तिने आरडाओरड केली.
पंजाबला उठवून आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने मुलाचा शोध घेतला. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीत चिमुकला दिसून आल्याने खळबळ उडाली. त्याला खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना तपासात काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यांनी चिमुकल्याच्या आई-वडिलांना संशयित म्हणून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला एकताने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी तिने मुलाला पाण्याच्या टाकीत टाकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

