मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- शहरात आज मोठ्या प्रमाणात क्राईम रेट वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात अजुन एक घटना समोर आली आहे. दारु घेतल्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने एका टोळक्याने युवकासह हॉटेल व्यवस्थापकास मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याची घटना औरंगाबाद नाका येथील सारंगबारमध्ये घडली.
युवकासह हॉटेल व्यवस्थापकास मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आल्या नंतर मितेश मनीलाल राठोड २४, रा. अमृतधाम याच्या फिर्यादीनुसार, रविवारी दि.१६ रात्री साडे दहाच्या सुमारास संशयित आकाश नरोडे २४, विकी नरोडे २५, रवी गांगुर्डे २५ अक्षय बेजेकर २६, दीपक बेजेकर व इतर तीघांनी सारंगबार येथून दारु घेतली. या दारुचे पैसे मितेश याने मागितले असता कुरापत काढून संशयितांनी मितेश व हॉटेल व्यवस्थापकास बेदम मारहाण केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

