पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
अंमली पदार्थ विरोधी पथक १ पुणे शहर
पुणे : पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ विक्री करणारे अवैध धंदयाबाबत माहिती काढुन कठोर कारवाई करण्याकरीता विशेष मोहिम राबविणे बाबत सुचना दिल्या त्यांचे सुचनेनुसार दिनांक १८/१०/२०२२ रोजी पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर व अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखे कडील पोलीस अंमलदार असे कोरेगांव पार्क पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पुणे- कोरेगांव पार्क येथील जर्मन बेकरी लेन नंबर ए सर्व्हे नंबर २९४ / ३ येथील द योगी रेस्टोरंट समोर सार्वजनिक रोडवर च्या समोरील सार्वजनिक रोडवर पुणे येथे इसम नामे १. ऋशीकेश अनिल पासलकर, वय २५ वर्षे, रा. अपर डेपो, बिबवेवाडी पुणे हा संशयितरीत्या मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता त्याचे ताब्यात कि.रु. त्याचे ताब्यात किं.रु. १,०४,५५०/- रु किये ६ ग्रॅम ९७० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) व एक मोबाईल फोन ५,०००/- रु किया असा एकुण १,०९,५५०/- किंवा ऐवज अनाधिकाराने बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळून आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे
सदरचा एम डी हा अंमली पदार्थ त्यास इसम नाने २ प्रणव प्रकाश ठाकुर, रा २०४ रविवार पेठ, पुणे याने दिला असल्याने त्या दोघांचे विरुध्द कोरेगांव पार्क पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ११२/२०२२. एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क). २२ ( ब ) २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तदनंतर पाहिजे आरोपी प्रणव प्रकाश ठाकुर, रा २०४ रविवार पेठ, पुणे याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन कोरेगांव पार्क पो स्टे येथे हजर करण्यात आले आहे.
त्यानंतर दुस-या एका कारवाईत दिनांक १८/१०/२०१२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा. पो. निरीक्षक, शैलजा जानकर व स्टाफ असे फरासखाना, खडक, समर्थ पो स्टे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना मौलाना अबुल कलाम चौक, तांबोळी मस्जिद समोर, इस्माईल हार्डवेअर दुकाना समोरील सार्वजनिक रोडवर ७११ रविवार पेठ, पुणे येथे इसम नामे ३ विशाल नंदकुमार शिंदे, वय-४१ वर्षे, रा. ९३० /१, शुक्रवार पेठ, खडक पोलीस लाईन खोली नं. १, पुणे हा संशयितरित्या मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता, त्याचे ताब्यात किं.रु. १,१५,३५०/- रु ०७ ग्रॅम ६९० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.). कि.रु. २०,०००/- चे दोन मोबाईल हॅण्डसेट किं.रु ८०,०००/- ची एक अॅक्टीवा दुचाकी वाहन असा एकूण २,१५,३५०/- रू किंमतीचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे. सदरचा एम डी हा अंमली पदार्थ त्यास इसम नामे ४ जुनेद अफजल खान, रा. १०११, रविवार पेठ, पुणे याने दिला असल्याने त्या दोघांचे विरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१९९ / २०२२. एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तदनंतर पाहिजे आरोपी जुनेद खान याचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन फरासखाना येथे हजर करण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पो. आयुक्त गुन्हे- १. श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक – १. गुन्हे शाखा, पुणे शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, राहुल जोशी, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

