Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नाशिक – मुंबई महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, ३१ ऑक्टोबर पर्यंत सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद पाडणार: छगन भुजबळ

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 19, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
नाशिक – मुंबई महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, ३१ ऑक्टोबर पर्यंत सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद पाडणार: छगन भुजबळ
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- नाशिक-मुंबई महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नाशिकचे माजी मंत्री उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे संतप्त झाले आहेत. या महामार्गावर प्रचंड खड्डे असून त्याचा मोठा त्रास वाहनधारक आणि प्रवशांना सहन करावा लागत असतो.यासंदर्भात वारंवार मागणी करण्यात येत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आता याची दखल भुजबळांनी घेतली असून त्यांनी आता थेट इशाराच दिला आहे. येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद पाडणार असल्याचे भुजबळांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत छगन भुजबळ यांनी आज सकाळीच नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली. फारसे खड्डे नसल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात होता. मात्र, भुजबळांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना नाशिक मुंबई महामार्गावरील खड्डे दाखवून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. खड्ड्यांमुळेच गंभीर अपघात होत असल्याची बाबही भुजबळांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. खड्ड्यांमुळे वेळ, पैसा, इंधन यांच्या अपव्यया बरोबरच जिवीत हानी देखील होत आहे. प्राधिकरणाच्यावतीने संबंधित कंत्राटदाराकडून कामे करुन घेत नसल्याने भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आता याप्रश्नी ११ दिवसांची मुदत खड्डे बुजविण्यास देण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावर हे सर्व खड्डे बुजवावेत जेणेकरुन गावी जाणाऱ्या किंवा येणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाहीव हे काम पूर्ण झाले नाही तर १ नोव्हेंबरपासून या महामार्गावरील सर्व टोल बंद पाडण्यात येतील, असा इशाराच भुजबळांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना देत लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका असा दम त्यांनी दिला दिला आहे.
छगन भुजबळ यांनी आज नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांची कानउघडनी करत फैलावर घेतले. यावेळी नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी साळुंखे, गोंदे ते पडघा टोलवेज पीक इंफ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई आग्रा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अनेकांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच नॅशनल हायवे यांना याबाबत पत्र व्यवहार केला आहे. मात्र अद्यापही रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याने आज छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यां समवेत नाशिक ते इगतपुरी दरम्यान रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना ३१ ऑक्टोबर पर्यंत रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास १ नोव्हेंबर पासून टोल बंद करण्याचा इशारा देखील दिला आहे.

Previous Post

मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करणा-या गुन्हेगारांना जेरबंद करून दोन धडकेबाज कारवाई

Next Post

नाशिक: विद्यूत पुरवठा खंडीत केल्याच्या रागातून वायरमनला मारहाण, दोघांविरुध्द भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक: विद्यूत पुरवठा खंडीत केल्याच्या रागातून वायरमनला मारहाण, दोघांविरुध्द भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

नाशिक: विद्यूत पुरवठा खंडीत केल्याच्या रागातून वायरमनला मारहाण, दोघांविरुध्द भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In