Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार बीड शहरातील 12 रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 19, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार बीड शहरातील 12 रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड:- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे बीड शहरातील नवीन 12 डीपी रस्त्यांना मंजुरी मिळाली या रस्त्याच्या कामाचा (ऑनलाइन) शुभारंभ आज दुपारी 4 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

बीड शहरातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान महा अभियान योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यातील 16 रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर आणखी 15 रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळावी यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता. तत्कालीन नगर विकास मंत्री व आजचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या टप्प्यातील 12 रस्त्यांच्या कामासाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रालयात पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला आहे.

गुरुवारी सायंकाळी 4 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते (ऑनलाईन) रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होणार असून यावेळी बीडचे पालकमंत्री अतुल सावे, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांची उपस्थिती राहणार आहे.

सदरील कार्यक्रम बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि माजी सभापती, सर्व नगरसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी पार पडणार आहे बीड शहरातील अंबिका चौक ते अर्जुन नगर रस्ता, राजीव गांधी चौक ते व्यंकटेश स्कुल रस्ता, राधाकिसन नगर ते सरस्वती शाळा सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, बार्शी रोड ते दीप हॉस्पिटल सिमेंट रस्ता व नाली, कासट ते शहर पोलीस स्टेशन रस्ता, मसरत नगर ते नेत्रधाम-सावरकर चौक रस्ता, शीतल वस्त्र भंडार दोन्ही बाजूचे रस्ते, पेठबीड पोलीस स्टेशन-ईदगाह-नाळवंडी नाका रस्ता,नाळवंडी नाका-पाण्याची टाकी रस्ता, बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा रस्ता,बार्शी रोड मुक्ता लॉन्स-तक्कीया मज्जिद अशा 12 रस्त्यांची कामे आता सुरू होणार आहेत. युवानेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी स्वतः उभा राहून शहरातील पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करून घेतली आता नवीन 12 रस्त्यांची कामे देखील नागरिकांना अडचण होणार नाही याची काळजी घेऊनच करणार असल्याचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे. दिलेल्या शब्दाची पूर्तता करून शहरातील कामांना प्राधान्य दिले जाईल असेही ते म्हणाले आज होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

Полный обзор приложения MostBet на телефо

Next Post

Скачать приложение Mostbet для Android APK и iOS в 1 клик 202

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

Скачать приложение Mostbet для Android APK и iOS в 1 клик 202

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In