विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
नगर :- दिवाळीत होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन, एसटी महामंडळाने 21 ते 31 ऑक्टोबर या अकरा दिवसांसाठी 10 टक्के भाडेवाढ केली आहे. 1 नोव्हेंबरपासून मात्र, पूर्ववत भाडे आकारले जाणार आहे. या भाडेवाढीचा गोरगरिब जनतेला मात्र, आर्थिक फटका बसणार आहे हे तितकेच खरे आहे.
दिवाळी म्हटले की, एसटी महामंडळाची आर्थिक चांदी हे समीकरण झाले आहे. दिवाळी, पाडवा व भाऊबीज या सणामुळे नागरिकांची विशेषत महिलांची महामंडळाच्या बसला मोठी गर्दीॅ नेहमी असते. या गर्दीचा आर्थिक फायदा उठविण्यासाठी महामंडळाने 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या अकरा दिवसांसाठी भाडेवाढीचा निर्णय घेतला.
ग्रामीण भागातील साधी व जलद बससाठी 9.70 पैसे, निमआराम, वातानुकूलित शिवाई आसनी व साधी शयनआसणी बससाठी 13 रुपये तर वातानुकूलित शिवशाही आसनी बससाठी 13.60 रुपये प्रति टप्पा भाडे आकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनतेने दिवाळी सुटीत सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या बसव्दारेच प्रवास करुन सहकार्य करावे, असे आवाहन अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केले आहे.
नगर येथून सुटणार्या बसचे तिकिट खाली दिलेल्या दरा नुसार राहणार आहे.
मुंबई 450 – 615 – 670 – 910 – 615
कल्याण 335 – 460 – 500 – 680 – 460
कोल्हापूर 575 – 785 – 855 – 1165 – 785
पंढरपूर – 325 – 445 – 485 – 660 – 445
नाशिक – 280 – 380 – 415 – 565 – 380
औरंगाबाद – 185 – 250 – 275 – 370 – 250
शेवगाव 105 – 145 – 160 – 215 – 145
जामखेड 125 170 185 255 170
श्रीरामपूर 115 160 175 235 160
कोपरगाव 165 225 245 330 225
पारनेर 70 90 100 135 90
संगमनेर 165 225 245 330 225
श्रीगोंदा 105 145 160 215 145
नेवासा 95 130 145 195 130
पाथर्डी 85 120 130 175 120
अकोले 205 275 300 410 275

