मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक/सिडको:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुणीला एका तरुणाने जातीवाचक संभाषण केलं त्यामुळे त्या तरुणीच्या भावना दुखावल्या. त्यामुळे त्या तरुणीने अंबड पोलिसांत तक्रार दाखल केली. अंबड पोलिसांनी गोविंदनगर कर्मयोगीनगर परिसरात राहणाऱ्या सनी न्याहाळदे वय २६ वर्ष या युवकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, संशयित सनी न्याहाळदे याने युवतीशी जातीवाचक संभाषण केल्यामुळे त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहेत.

