पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख…..
वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे. दि. १३/१०/२०२२ रोजी कियांदी हे त्यांचे टाटा कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो यावर श्रीराम चौक, हांडेवाडी रोड, सातवननगर जवळ, हडपसर, पुणे या ठिकाणी आईस्क्रिमची विक्रीचा व्यवसाय करीत असताना श्रीराम चौकाचे दिशेने तीन मोटार सायकलवरून सहा ते सात अनोळखी इसम हे त्यांचे तोंडाला काळे फडके बांधून फिर्यादीचे जपळ आले. त्यावेळी त्यातील एकाने फिर्यादीकडे पैशांची मागणी केली असता फिर्यादीने त्यास नकार दिल्याने त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून त्यांचे हातातील लोखंडी रॉड न लाकडी दांडक्याने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून टेम्पोच्या ड्राव्हरमधील आठ ते दहा हजार रूपये जबरदस्तीने चोरी करून घेवून जात असताना त्यांचे हातातील लोखंडी रॉड व लाकडी दांडके हवेमध्ये फिरवत जोर जोरात आरडा ओरडा करत “हम यहाँ के दादा है, हमको पैसा देनाही पडेगा, अगर कोई बीचमे आयेगा तो उसे हम जिंदा नहीं छोलेंगे” असे म्हणत दहशत निर्माण करून निघून गेले, म्हणून वरील सहा ते सात अनोळखी इसमांविरुध्द कायदेशीर तक्रार आहे. वगैरे मजकुरबी फिर्याद दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचे अनुषंगाने वानवडी पोलीस स्टेशन, तपास पथकातील अधिकारी व स्टाफ यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक दृष्ट्या तपास करुन नमूद गुन्हयातील खालील आरोपींना अटक करून त्यांचकडून एक गावठी पिस्टल, एक जिवंत राऊड दोन तलवार, रॉड, लाकडी दांडके, दोन मोटारसायकल व काळया रंगाचे मारक व रोख रक्कम असा एकूण कि रु १.६८.३१०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
नमुद गुन्हयातील अटक आरोपी नामे १) विक्रम व्यंकट राठोड, वय-२३ वर्षे, रा. अमारा क्याड्रिम रेसीडन्सी, फ्लॅट नं.सी. ३०४, पुणेकर चौक, न्याती हेटनिर्टी जवळ, उंड्री, पुणे. २) परमेश्वर कामन्ना माने, वय- २७ वर्षे, रा. रघुनाथ कॉम्प्लेक्स, होलेवस्ती, उंड्री पुणे ३) राजकुमार रमेश माने, वय-२१ वर्षे, रा. लेन नं. १२ तुळजाभवानी नगर, खराडी बायपास येथिल दर्ग्याजवळ, उमेश पठारे यांचे घरात, खराडी, पुणे व ४) नवनाथ दाजी जाधव, वय २२ वर्षे, रा. अक्षय टकले यांचे घरात टकले बस्ती, सिटी सेन्ट्रल मॉल जवळ, उंड्री, ५) माधव निवृत्ती सुर्यवंशी, वय २५ वर्षे, रा. सुरज घुले यांचे रुमवर भाड्याने, घुलेनगर, पिराचे मंदिराजवळ, महंमदवाडी, पुणे ६) मारुती सायवन्ना जाधव, वय २० वर्षे, रा. जनक बाबा दर्ग्याजवळ, खराडी, पुणे व एक विधीसंघर्षीत बालक असे आहेत. यातील अ.क्र. २, ३ व ४ हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.
सदरची कारवाई ही श्री नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व विभाग, पुणे शहर, श्रीमती, नम्रता पार व संदिप शिवले पोलीस निरीक्षक (गुन्हे), बावडी पो.स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक, जयवंत जाधव, पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले व पोलीस अंमलदार संतोष तानवडे, अमजद पठाण, संतोष काळे, संतोष नाईक, विनोद मेडजकर, अतुल गायकवाड, महेश गाढवे सर्फराज देशमुख, राहुल गोसावी, निळकंठ राठोड, संदीप साळवे, अमोल गायकवाड, विष्णु सुतार व विद्वल चोरमले या विशेष पथकाने केली आहे.

