शेतकऱ्यांना दसऱ्या आधी मिळणारी नुकसान भरपाई दिवाळी आली तरी मिळाली नाही- विजय देशमुख भाजपा यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रताप वाघमारे यांना निवेदन.
अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
सावनेर:- यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने वाढिव आर्थिक मदत शेतकऱ्यांना जाहीर केली व ती शेतकऱ्यांच्या खात्यात दसऱ्या पूर्वी जमा व्हावी याकरिता प्रत्येक तालुका मुख्यालयी तशी आर्थिक व्यवस्था सुद्धा केली परंतु सावनेर तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पर्यंत नुकसानभरपाई जमा झालेली नाही. त्यामुळेच सावनेर भाजपा तालुका अध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रताप वाघमारे यांना निवेदन देत अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे बळीराजाची दिवाळी अंधारात जाऊ नये त्यासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष विजयबाबु देशमुख, माजी नगरसेवक तुषार उमाटे, मंदार मंगळे, सुरेंद्र शेंडे, दिगांबर सुरतकर, सोनू नवधिंगे, रमेश चवारे, चंपालाल मलापुरे, नरेंद्र ठाकूर, आशिष माटे, अनिल तंबाखे, ज्ञानेश्वर चौधरी, उज्वल करडभाजने, पियुष बुरडे आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

