भारतातील अतिशय दुर्मिळ निमविषारी साप. तब्बल सहा वर्षांनी आढळला राजुऱ्यात दुसर्यांदा हा साप.
संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची उप समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वन्यजीव संवर्धन समितीच्या राजुरा टीम ने भारतीय अंडे खाऊ साप (इंडियन एग ईटर स्नेक ) या निमविषारी प्रजातीमधील भारतातील अतिशय दुर्मिळ अश्या सापाला जीवनदान देऊन त्याच्या नैसर्गिक अधिवासात निसर्गमुक्त केले.
दि.26 ऑक्टोबर 2022 ला जवाहर नगर राजुरा येथील रहवासी राकेश दुरुटकर यांच्या घरी साप असल्याची माहिती कळताच वन्यजीव संवर्धन समितीचे सर्पमित्र विजय पचारे यांनी तात्काळ धाव घेत या सापाला सुरक्षितपणे पकडले. याच प्रजातीचा साप यापूर्वी 9 ऑगस्ट 2016 ला रात्रौ राजुरा येथील एस. टि. महामंडळ च्या आगार व्यवस्थापक यांच्या निवासस्थानि आढळून आला होता. त्या सापाची लांबी 2.9 फूट एवढी होती. तब्बल सहा वर्षांनी पुन्हा एकदा हा दुर्मिळ साप आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्या करिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वन्यजीव संवर्धन समितीने पुढाकार घेत आपले कार्य जोमाने सुरु केले आहे. कोणत्याही प्रजातिच्या सापाना पकडल्या नंतर रितसर त्यांची वनविभाग कार्यालय राजुरा येथे रजिस्टर मधे नोंदणी करून वनविभागाला माहिती दिल्यावरच या सापाना जंगलात सुरक्षित ठिकाणी निसर्गमुक्त केल्या जाते.
वन्यजीव संवर्धन समितीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदीप आदे, राजुरा तालुका संघटक विजय पचारे, अमर पचारे, मनोज कोल्हापूरे, रतन पचारे आदींनी या कार्यात स्वतः ला झोकून दिले आहे. आपले दैनंदिन कार्य सांभाळून हे सर्पमित्र म्हणून प्रामाणिकपणे कार्यकरीत आहेत. वन्यजीव संवर्धन समितीच्या या कार्याबद्दल नेफडो चे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक भंवर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, महाराष्ट्र राज्य महिलाव अध्यक्षा डॉ. प्रिती तोटावार, नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समिती विभाग अध्यक्षा अल्का सदावर्ते, जिल्हा अध्यक्षा रजनी शर्मा, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संतोष देरकर आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.