मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
अहेरी:- उपविभागीय अंतर्गत येत असलेले रेपणपल्ली पोलीस स्टेशन मध्ये दिवाळी सणाचे औचित्य साधून आज दिनांक 27 ऑक्टोंबर रोजी दिवाळी सणाचे औचित्य साधून आदिवासी बांधवांसोबत दिवाळी या उपक्रमांतर्गत उप पोलीस स्टेशन रेपनपल्ली हद्दीतील नागरीकाना व शाळेतील मुलांना उप पोलीस स्टेशन येथे बोलवुन १०० फराळाचे तसेच राशन कीटचे, ७० महिलांना साडया व ३० शाळेतील मुलांना कपडे वाटप करुन त्यानची दिवाळी केली. उप पोस्टे रेपनपल्ली येथिल आधीकारी, अमंलदार व एसआरपीएफ यांनी स्वखर्चाने सदर चे साहीत्य विकत घेऊन वाटप केले.
त्याचप्रमाणे पोलीस दादारोला खिडकी उपक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेणे बाबत आव्हान करण्यात आले. सदर कार्यक्रमाला हद्दीतील 400 ते 450 नागरीक उपस्थित होते. चहा व नास्त्याची व्यवस्था करून कार्यक्रम शांततेत पार पाडला. आदिवासी बांधवांसह दिवाळी उपक्रमासाठी उप पोस्टे रेपनपली येथील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे आर्थिक सहकार्य लाभले.
