सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- आज मोठ्या प्रमाणात कंपन्या कामगाराचे शोषण करत असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक बातमी समोर येत आहे. जीआरएन कन्स्ट्रक्शन या कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कामगाराचे कंपनीने दिवाळीचा बोनस हडप केला. त्यामुळे शेकडो कामगारांमध्ये असतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या कामगारांनी जीआरएन कन्स्ट्रक्शन विरुध्द आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जीआरएन कन्स्ट्रक्शन या कंपनीत 160 कामगार परप्रांतीय, त्यामुळे कंपनी चालक शासनाने आखून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली करत आहे. ऐंशी टक्के कामगार स्थानिक असावेत असे असताना, ही कंपनी परप्रांतीय कामगारांना भरती करून त्यांचे पण मोठ्या प्रमाणात शोषण करण्यात येत आहे. त्यात वेकोलि व्यवस्थापन ही आंधळेपणाने सहकार्य करत आहे. जीआरएन कंपनीचा मनमानी कारभार विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने व कामगाराना कंपनीने दिवाळीत बोनस न दिल्याने कामगारांनी व्यक्त केली नाराजीची भावना निर्माण झाली आहे. दिवाळीच्या दहा दिवस अगोदर पासून बोनसची मागणी जोर धरू लागली होती.
कामगारांमध्ये खळबळ, मात्र कामगारांची पिळवणूक करणाऱ्या जीआरएन कन्स्ट्रक्शन कंपनीने दिवाळीचे पाच दिवस उलटूनही बोनस दिलेला नाही. बोनस न मिळाल्यास कंपनीला लेखी निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंपनीला दिवसात तारे दाखवण्यासाठी सर्व कामगारांनी एकत्र येऊन समाजसेविका सरिता मालू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात्मक भूमिका स्वीकारली असून त्यात काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व कामगारांना लवकरात लवकर बोनस द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जीआरएनने कंपनीकडे दिला आहे. जीआरएन कंपनीचे व्यवस्थापक व्यंकट रमण यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की, अवकाळी पावसामुळे गेल्या चार महिन्यांपासून काम बंद आहे. कामगारांना पगार दिला जात आहे. सोमवारी सर्व कामगारांना बोनसची माहिती देण्यात आली आहे.

