फयाज शेख पुणे शहर प्रतिनिधी...
कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर
पुणे : कोथरुड पोलीस स्टेशनकडील रेकार्डवरील गुन्हेगार १) सागर ऊर्फ मांडी तानाजी येनपुरे रा. केळेवाडी, कोथरूड पुणे (टोळीप्रमुख) व त्याचे टोळीमधील सदस्य तथा कोथरूड पोलीस ठाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार १) साहिल विनायक जगताप रा. सदर २) अक्षय दामु वाळुंज रा. सदर ३) सुरेश कालीदास बाजे रा. सदर ४) वैभव ऊर्फ भो-या प्रदिप जगताप रा. सदर यांचेवर कोथरुड पोलीस ठाणे येथे वैयक्तीकपणे खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याची धमकी देणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे, इच्छापुर्वक जबर दुखापत करणे, लोकांची जीवीतास धोका निर्माण करण्याचे उद्देशाने दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत. शरीराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.
नमुद आरोपी नामे १) सागर ऊर्फ मांडी तानाजी येनपुरे (टोळीप्रमुख) व त्यांचे साथीदारा
विरुध्द कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा रजि.नं. २३३/२०२२ भादंवि क. ३९५ आर्म अॅक्ट ४
२५. ग. पो. अधि.क. ३७०(१) सह १३५ क्रि. लॉ क. ३. ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील नमुद आरोपीतांवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा ते जुमानत नसल्यामुळे तसेच त्यांच्या वर्तनात काहीही सुधारणा होत नसल्यामुळे कोथरूड पोलीस स्टेशन गु.र.नं. २३३ / २०२२ या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२). ३(४) चा अंतर्भाव करणेसाठी सदर कायदयाचे कलम २३ (१) (अ) अन्वये मंजुरी मिळणे करीता वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री महेंद्र जगताप, कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ०३ पुणे शहर व श्रीमती पौर्णिमा गायकवाड यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेंद्र डहाळे यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करुन आरोपी नामे १) सागर ऊर्फ मांडी तानाजी येनपुरे ( टोळीप्रमुख) २) साहिल विनायक जगताप रा. केळेवाडी कोथरूड पुणे ३) अक्षय दामु वाकुंज रा. सदर
४) सुरेश कालीदास वाजे रा. सदर ५) वैभव ऊर्फ भो या प्रदिप जगताप रा. सदर यांचेविरुद्ध दाखल असलेल्या कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा रजि.नं. २३३ / २०२२ भादवि.क. ३९५ आर्म अॅक्ट ४, २५ म.पो.अधिक ३७(१) सह ५३५ क्रि. लॉ. क. ३. ७ प्रमाणे या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२) ३(४) चा अंतर्भाव करणेची मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री राजेंद्र डहाळे यांनी मंजुरी दिलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहायक पोलीस आयुक्त, श्रीमती रुक्मिणी गलांडे कोथरूड विभाग हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताम गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ०३- श्रीमती पौर्णिमा गायकवाड, मा. सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग श्रीमती रुक्मिणी गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरुड पोलीस ठाणे श्री. महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक, गुन्हे श्री. बाळासाहेब बडे, पोलीस उपनिरीक्षक तानाजी पांढरे, पोलीस उप निरीक्षक प्रविण कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय सावंत व अनिल बारड यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुद्ध व गालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली चालु वर्षातील ४१ वी एकुणातील १०४ वी कारवाई आहे.

