सास्ती व आजूबाजूच्या गावकऱ्यांनी उलगुलान संघटनेद्वारा ओपन कास्ट बंद करण्याची मागणी
सौ. हनिशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
चंद्रपूर:- जिल्हा हा कोलमाईन्सचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. पण आज या कोलमाईन्स मुळे अनेकांच्या मनात जगायचं कसं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ओपन कास्ट कोल माईन्स आहे. या कोलमाईन्स मध्ये दररोज होणारी ब्लास्टिंगमुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजुरा तालुक्यातील सास्ती हे गाव जवळपास ३००० लोकवस्तीचे आहे. या गावाला लागूनच धोपटाळा ओपन कास्ट कोल माईन्स आहे. या कोलमाईन्स मध्ये दररोज होणारी ब्लास्टिंग यामुळे सास्ती व आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या घरांना भेगा पडत आहेत. या तीव्र ब्लास्टिंगमुळे अनेक जणांचे घरे पडलेली असून घरांना भेगा पडल्यामुळे अनेक घरे उध्वस्त होऊन यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सदर ओपन कास्ट कोल माईन्स ही या परिसरासाठी अत्यंत धोकादायक झालेली असून यामुळे या परिसराचे प्रदूषणही वाढलेले आहे. प्रदूषणाच्या व ब्लास्टिंगच्या समस्येमुळे या ठिकाणाचे नागरिक भयभीत झालेले असून आपले जीव मुठीत धरून जिवन जगत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून शासन व प्रशासनाने तसेच कॉलमांईस व्यवस्थापनाने सदर ओपन कास्ट कोल माईन्स तात्काळ बंद करावी याकरिता उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी परीसरातील गावकऱ्यांना घेऊन निवेदन दिले. जर सदर कोल माईन्स बंद करून येथील नागरिकांना न्याय दिला नाही तर या विरोधात उलगुलान संघटना तीव्र आक्रोश व्यक्त करत कोल माईन्स बंदच्या विरोधात मोठे आंदोलन पुकारणार असा इशारा राजू झोडे यांनी निवेदनतून दिला. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

