पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी
लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे. लोणीकंद पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार *गणेश रामदास काळे* , वय ३२ वर्षे, रा. वाघेश्वर नगर गोरेवस्ती रोड वाघोली पुणे यांस पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१)(अ) (ब) प्रमाणे पुणे जिल्ह्यातुन ०२ वर्षाकरीता तडीपार केले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोली, लोहगाव व नजिकच्या भागात दहशत निर्माण करन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या, लुटमार करणाऱ्या गंभीर दुखापत, घातक शस्त्र वापरून दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातून कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. सदर सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सदर इसमावर मा. सहा पोलीस आयुक्त श्री *किशोर जाधव* , लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष् पोलीस निरीक्षक, *श्री गजानन पवार* , पोलीस निरीक्षक गुन्हें *श्री मारुती पाटील* यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक *रामकृष्ण दळवी* , पोलीस नाईक *प्रशांत कापुरे, सागर कडु* यांनी सदर सराईत टोळीप्रमुख व त्याचे साथीदार इसम यांचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसमांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उप आयुक्त श्री रोहिदास पवार यांना प्रस्ताव पाठविला असता श्री रोहिदास
पवार यांनी सदर सराईतास ०२ वर्षाकरीता पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन तडीपार केले आहे,
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त सो. *श्री. नामदेव चव्हाण, मा. पोलीस उप आयुक्त सो. श्री. रोहिदास पवार, मा. सहा. पोलीस आयुक्त सो. श्री. किशोर जाधव, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु* यांनी केली आहे.