प्रशांत जगताप
तरोडा:- आर्वी तालुक्यातील रमाबाई बुद्ध विहार तरोडा येथील विहाराच्या प्रांगणात गाव तेथे शाखा, घर तेथे सैनिक व विहार तेथे वाचनालय या अभियानांतर्गत ग्राम शाखा स्थापन करण्यासंदर्भात समता सैनिक दलाची सभा पार पडली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचारक अभय कुंभारे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वर्धा जिल्हा सुरक्षा विभाग प्रमुख प्रदीप कांबळे, वर्धा तालुका संघटक मनोज थुल, ज्येष्ठ मार्गदर्शक पुडलीकजी गाडगे, दिगांबरजी लांबे, गौरव मानकर हे उपस्थित होते.
सुरुवातीला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला जिल्हा संघटक अभय कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले व त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचारक अभय कुंभारे अध्यक्षतेखाली समता सैनिक दल तरोडा ग्राम शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.त्यानंतर जिल्हा संघटक अभय कुंभारे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.
या ग्राम शाखा संघटकपदी मार्शल गजानन येसनकार, सह-संघटकदी मार्शल राहुल करमकार तर शाखा निमंत्रक म्हणून मार्शल बलराम रामटेके, शाखा-प्रचारक मार्शल प्रदीप दिपके, शाखा कोषप्रमुख यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून मार्शल तेजस कोल्हे, शरद येसनकार, शुभम कोल्हे, संतोष येसनकार, प्रभाकर रामटेके, भाऊराव येसनकार, अमोल दाभणे, शैलेश कांबळे, प्रदीप गवळी, आशा रामटेके, रंजना थुल, प्रेमिला येसनकार, सुजाता येसनकार यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन आर्वी तालुका संघटक प्रफुल काळबांडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नंदाबाई करमकार यांनी मानले. या कार्यक्रमाचा शेवट समापन गाथेने करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला ओम थुल, आम्रपाली येसनकार, रंजना थुल, पदमा दिपके, वंदना कोल्हे,प्रभा कांबळे, नंदा कळमकार, सुजाता येसनकार, स्नेहल येसनकार, कविता कोल्हे, कांता कांबळे, जयश्री मेंढे, सुजाता येसनकार, वैशाली येसनकार, रंजनाबाई थुल, गुणाबाई येसनकार, जाई मेंढे, नेहा थुल, भाऊराव येसनकार, ज्ञानेश्वर कोल्हे, राजेश येसनकार, अविनाश कोल्हे, तेजस कोल्हे, राहुल करमकार, करण रामटेके, प्रदीप दिपके आदी पदाधिकारी ,कार्यकर्ते व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.