पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
दि.०२.११.२०२२ रोजी पुणे परीसरात बेकायदेशीरपणे पत्त्यांचा जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या बातमीनुसार सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखे कडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवून छापा टाकला असता, काही इसम बेकायदेशीर पत्त्याचा जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने पत्त्याचा जुगार खेळणारे १७ इसम मिळुन आले.
सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम २४,७२०/- रु. व १६ मोबाईल अंदाजे रक्कम ७७,०००/- रु. असे एकुण १,०१,७२०/- रु. घटनास्थळावरून जप्त केले. सदर प्रकरणी नमुद १७ इसमांविरूध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुरनं २७६ / २०२२ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी श्री अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री श्रीनिवास घाडगे, पोलीस उप आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, संदिप कोळगे, अमित जमदाडे, पुष्णेंद्र चव्हाण या पथकाने केली आहे.

