राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर ग्रामीण सचिव राजू खांडे यांची मागणी
अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
नागपूर/सावनेर:- नागपूर जिल्हातील सावनेर वेकोली येथे खान क्र.1 क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या झाडाची कत्तल करण्यात आली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या झालेल्या झाडांच्या अवैद्य कत्तल संदर्भात उपक्षेत्रीय खान प्रबंधक अविनाश प्रसाद, उपविभागीय अधिकारी सावनेर यांना निवेदन देण्यात आले. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
सावनेर वेकोलि खान क्र.1 मध्ये झालेल्या झाडांच्या अवैद्य कत्तल मध्ये तेथील कर्मचारी, अधिकारी, सेफ्टी मॅनेजर पाटील व मेश्राम यांच्या संगणमतामुळे वेगवेगळ्या प्रजातीची झाडे कापण्यात आलेली असून कटाई झालेला माल प्रायव्हेट गाडी मध्ये भरून परस्पर विकल्या जात असल्याचे राष्ट्रवादी नेते राजू खांडे यांच्या लक्षात आले तिथे जाऊन त्यांनी विचारपूस केली असता कटाईची व विक्रीची परवानगी वेकोलिची घेतलेली आहे का ? त्यावर त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. अधिकारीवर्ग आपल्या पदाचा दुरुपयोग करीत आहे. त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. त्यांनी पर्यावरणाला हानी पोहोचविण्याचे कार्य केलेले आहे.
खान क्र.१ चे प्रबंधक सुजित कुमार सिंग यांच्या कडे तक्रार करण्यात आली असता. त्यांनी सांगितले की विद्युत तारांना झाडांपासून अडथळा निर्माण होत असल्यामुळे ही झाडे कापण्यात आली असावी असे माझे मत आहे. परंतु ज्या परिसरातून विद्युत लाईन गेलेली आहे त्या परिसरातील झाडे न कापता दुसऱ्याच परिसरातील झाडाची कटाई करण्यात आलेली आहे. असे चित्र घटनास्थळावरून दिसून येत आहे.
तसेच वरिष्ठ खान प्रबंधक प्रसाद यांना निवेदन देऊन विचारले असता झाडे कापण्याची वेकोलिची परवानगी घेतली होती काय ? त्यांनी सांगितले कि मी याबद्दल चौकशी करतो आणि यात अधिकारी-कर्मचारी, ठेकेदार कोणी जर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईसुद्धा करील असे आश्वासन यावेळी यांनी दिले.
यात वरिष्ठ अधिकारी सहभागी तर नाही?
27 सप्टेंबरला या झाडांची अवैध कत्तली संदर्भात कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वर्गाला तक्रार दिली होतो. पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तक्रारीला केळाची टोपली दाखवत दीड महिन्याच्या कालावधी लोटून सुद्धा कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर मिलीभगत तर नाही ना? असा संशय नागरिकाचा मनात निर्माण झाला आहे.
15 दिवसात कारवाई नाही तर आंदोलन.
15 दिवसात दोषीवर कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल व निर्माण झालेल्या परिस्थितीस आपण स्वतः जबाबदार राहाल अशी मागणी कारवाईसाठी देण्यात आलेल्या निदेनातून यावेळी करण्यात आली. यावेळी राजू खांडे, दशरथ मतेल, मनोहर जामदार, सचिन ठाकूर, गोलू वीरसेन, दीपक पटेल, पत्रकार युवराज मेश्राम, अनिल अडकिने व मधुकर माेवाडे सह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

