पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख
खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर
खंडणी विरोधी पथक – १ गुन्हे शाखा, पुणे शहर येथे तक्रारदार यांना सावकार इसम नागराज ऊर्फ नागेश रत्नाकर नाईकोडी. रा. शनीनगर कात्रज, पुणे याने अवाजवी व्याजाच्या पैशाची मागणी करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत असलेबाबत तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता.प्राप्त तक्रारी अर्जाची चौकशी करता अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी वेळोवेळी १ लाख रूपये १५ व्याज दराने दिले होते. अर्जदारांनी त्याबदल्यात अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना ५ लाख ९५ हजार रूपये दिले असतानादेखील गैरअर्जदार हे अर्जदारास दंड व व्याजा पोटी आणखी २ लाख ५० हजार रूपयांची मागणी करीत होता. व्याजाचे पैसे दिले नाही म्हणुन वारंवार धमकी देणा-या सावकारा विरुद्ध खंडणी विरोधी पथकाने सदर अर्जाची चौकशी करुन व्याज आकारणा-या व व्याज नाही दिले म्हणुन अर्जदारास व त्याच्या पत्नीस डांबुन ठेवुन बळजबरीने ऑनलाईन पैसे पाठविण्यास लावुन शिवीगाळ तसेच धमकी देणारा सावकार नागराज ऊर्फ नागेश रत्नाकर नाईकोडी, रा. शनीनगर, कात्रज, पुणे याचेविरुध्द चौकशीअंती दिनांक ०३/११/२०२२ रोजी सिंहगड रोड पो स्टे गु.र.नं.४६४ / २०२२, भा.दं.वि. कलम ३८४,३८५,३८६, ४५२, ५०४, ५०६, महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९, ४५ अन्वये खंडणी विरोधी पथक – १, गुन्हे शाखा, पुणे शहर याचेकडुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा तपास सिंहगड पोलीस ठाणे हे करीत आहेत..
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता व मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. रामनाथ पोकळे, मा… पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहायक पोलीस आयुक्त – १ गुन्हे शाखा, श्री गजानन टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक, अजय वाघमारे, सपोनि अभिजीत पाटील , पोउनि विकास जाधव, पोलीस अंमलदार, प्रमोद सोनवणे. रविंद्र फुलपगारे, राजेंद्र लांडगे, हेमा देवे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण व संभाजी गंगावणे यांनी केली आहे.

