✒️नासिर सुलेमान खान, प्रतिनिधी
अमृतसर/मुंबई:- पंजाबमधील अमृतसर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील शिवसेनेचे मोठे नेते असलेले सुधीर सुरी यांच्यावर पोलिसांसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण पंजाब राज्य हादळले आहे. ही घटना अमृतसरमधील एका मंदिराबाहेर घडली आहे. घटनेवेळी पोलिस तिथेच उपस्थित होती.
शिवसेनेचे नेते आपल्या समर्थक कार्यकर्त्यां बरोबर मंदिराबाहेर ठिय्या आंदोलन करत होते. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. त्यावेळी आरोपींनी सुरी यांच्यावर दणादण गोळीबार करत अनेक गोळ्या झाडल्या आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी सुरी यांचा मृतदेह ताब्यात देऊन पुढील तपास सुरू केला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
शिवसेना नेते सुधीर सुरी हे अमृतसरमधील मंदिराबाहेर आंदोलन करत होते. त्यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यावेळी जमलेल्या जमावामधून कोणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गर्दीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याने तिथे प्रचंड गोंधळ उडाला होता. सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या खळबळजनक घटनेनंतर या संपूर्ण परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली गेली असून पोलिसान समोर झालेल्या हा सुरीचा हत्येमुळे पंजाबमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुधीर सुरी हे शिवसेना पक्षातील आणि पंजाबमधील एक मोठे नेते होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

