✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी
वर्धा:- जिल्हात नवीन आलेल्या पोलिस अधीक्षक यांच्या कारवाईचा अवैध धंदेवाल्यामध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदयावर कारवाईचा सपाटा लावला असून त्यामुळे गुन्हेगाराचे धागे दणकावले आहे.
नवीन पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांचे आदेशाने व पोलिस निरीक्षक हेमंत चांदेवार यांचे सुचनेनुसार रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्ड वरील 7 अवैध दारू विक्रेते यांचे कडून पुन्हा दारू विकून दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता असल्याने त्यांना पोलीस स्टेशनला 151 सीआरपीसी नुसार अटक करण्यात आली तसेच आर्वी नाका, नालवाडी, सिंधी मेघे, रामनगर, शांतीनगर भागात दोन अधिकारी व 15 अंमलदार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अवैध धंदे करणार्यांचा शोध घेण्यात आला. सदरच्या कार्यवाही सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय मिश्रा पोलिस उपनिरीक्षक नितनवरे, विष्णु भांडवले यांनी केली.

