पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे : दि.०५/११/२०२२ रोजी हडपसर हद्दीत बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीर कल्याण मटका जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने जुगार घेणारे व जुगार खेळणारे १९ इसम मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यात रोख रक्कम ३१,४१०/- रू.व १५ मोबाईल अंदाजे ७०,०००/-रु. तसेच जुगाराचे साहित्य असा एकुण ०१,०१,४१०/- रु. चा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला.
सदर प्रकरणी नमुद १९ इसम व पाहिजे इसम ०१ असे एकुण २० इसमांविरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरनं १३७५ / २०२२ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम ४ ( अ ) ५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीत हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कुमार तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार अजय राणे, अण्णा माने, इरफान पठाण, संदिप कोळगे, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.