वैशाली गायकवाड उपसंपादक पुणे
पुणे:- 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी भारतरत्न डॉ आंबेडकर आंबेडकर हे पहिल्यांदा शाळेत गेले होते. त्यामुळे हा “दिवस विद्यार्थी” दिवस म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचीत साधून कलवड येथे सावित्री महिला मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांना हातात संविधानाच्या प्रत देऊन रॅली काढण्यात आली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी दिलेले जीवन परिवर्तनाचे घोषवाक्याने संपूर्ण परिसर दुमजला. या रॅली मध्ये बाल चमू उत्साहात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना सावित्री महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा कांबळे म्हणाल्या की 7 नोव्हेंबर हा आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो, कारन डॉ. बाबासाहेब जर शाळेत गेले नसते तर आपला आज उद्घारच झाला नसता. आपल्याला समाजात आज जे स्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे ते विसरून चालणार नाही. आपण ज्या पद्धतीने मोठ्या उत्साहात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो, त्याचप्रमाणे आपण आजचा हा दिवस देखील अती उत्साहात साजरा केला पाहिजे. आपल्या देशाला जगात सर्व श्रेष्ठ अशी भारताची राज्यघटना लिहून समता, न्याय, बंधूता या मार्गाने जे संविधान लाभले आहे त्यामुळेच आज सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहे. म्हणूनच आजचा दिवस आपण जल्लोषात साजरा केला पाहिजे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण दोन विद्यार्थी ठरले त्यांनी रमाबाई व बाबासाहेब यांचा वेष परिधान केला होता. यावेळी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले व प्रश्न मंजुषा ठेवून बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित प्रश्न विचारले गेले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती बार्टीच्या प्रमुख प्रकल्प अधिकारी शितल बंडकर, वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता चव्हाण, महासचिव सारिका फडतरे, किर्ती आखाडे, सावित्रीबाई फुले संस्थेच्या अधिकारी गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या मनिषा गायकवाड तसेच सावित्रीबाई मंडळाच्या सर्व पदाधिकारी महिला, लहान मुले, वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते संदीप कांबळे व राकेश गायमुकते उपस्थित होते. तर कु. साक्षी गायकवाड ही रमाबाई आंबेडकर तर कु. सूजल शिंदे याने बाबासाहेब आंबेडकरांची व्यक्तीरेखा साकारली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348