आ. धोटेंनी आरोग्य व पोलीस विभागाशी संपर्क साधून मदत पोहोचविल्याने अनर्थ टळला.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
धाबा:- चंद्रपूर महामार्गावार गोंडपिपरी जवळ दोन दुचाकीस्वार समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामुळे क्षातीग्रस्त झाले. यामध्ये पवन राजु बामणे रा. कोठारी आणि श्रीकांत कृष्णकांत कृपाकर रा. आष्टी अशी या दोन्ही दुचाकीस्वारांची नावे असून ते दुचाकी अपघातात जखमी होऊन पडले होते. या दरम्यान आमदार सुभाष धोटे हे धाबा येथे रस्ते विकासकामाचे भूमिपूजन करून दुसऱ्या कार्यक्रमाला याच मार्गाने जात असताना त्यांना हे दोन्ही दुचाकीस्वार अपघात क्षतिग्रस्त झालेले दिसले तेव्हा त्यांनी आपली कार थांबवून स्वतः या अपघाताची चौकशी केली. आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने गोंडपिपरी आरोग्य विभाग व पोलीस विभागाशी संपर्क साधून तत्काळ मदत यंत्रणा बोलवून दोघांना दवाखान्यात भरती करण्यास सांगितले.
दोन दुकाची स्वाराचा अपघात झाला होत्या त्याच वेळी आमदार सुभाष धोटे हे त्या रस्त्यांनी जात होते. त्यांनी गाडी थांबवून त्या जखमीची विचारपुस करत मदत केली. त्यावेळी आमदार धोटे यांनी गोंडपिपरी पोलिस निरीक्षकांना यांना बोलावून या दोन्ही जखमींना तातडीने मदत पोहचविली.
आमदार सुभाष धोटे यांच्या या संवेदनशील आणि माणूसकीच्या व्यवहाराने या दोन्ही अपघात ग्रस्तांना तातडीने मदत व उपचार पोहोचली व मोठा अनर्थ टळला आहे. तर आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी येथील आपल्या कार्यकर्त्यांना सांगून या दोन्ही अपघातग्रस्तांकडे लक्ष देऊन आवश्यक मदत कार्य पोहोचविण्याच्या सुचना दिल्या आहेत.