सौ. हानिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- जील्हातील दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका इसमाचा हैवानियतची परिसीमा गाठत खून करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादळला आहे. चंद्रपूर जवळ असलेल्या दुर्गापूर येथील वीज निर्मिती केंद्राच्या मेजर गेट जवळ नायरा पेट्रोल पंपजवळ एका तरुणाची धारदार शास्त्राने धडावेगळे मस्तक करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास घडली. महेश मेश्राम वय 32 वर्ष रा. आयप्पा मंदिर परिसर चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
परिसरात हत्या झाल्याची माहिती संपूर्ण गावात पसरल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून काहीच अंतरावर दुर्गापूर पोलीस ठाणे आहे. सूत्रांकडून माहितीच्या आधारावर सुमारे आठ ते दहा जणांनी मिळून आरीने शीर कापून हत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती होताच दुर्गापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच घटनास्थळावरून हलविला.
दुर्गापूर येथे वीज निर्मिती केंद्र असल्यामुळे हा परिसर गुन्हेगारीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील मानला जातो. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. मृतकाने काही दिवसांपूर्वी कुणाला तरी मारहाण केली होती. यातूनच ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे.
घटनास्थळाजवळ इमली बियर बार आहे. या बारमध्ये भांडण झाले. येथून महेश मेश्राम याला 8 ते 10 आरोपींनी मिळून मारहाण करीत पेट्रोल पंप परिसरात नेले. तेथे दगडाने मारहाण केली. यानंतर धारधार शस्त्राने शीर धडावेगळे करून हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. रात्री 12.20 वाजता पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेत आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.