पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख
हिंजवडीपोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड
पुणे : सशस्त्र दरोड्याचे तयारीत असलेले दरोडेखोरांना शिताफीने पकडून त्यांचेकडून दोन गावठी पिस्टल दोन जीवंत राऊंड, कोयता, पालघन अशी हत्यारे व मोबाईल फोन असा एकूण १,२८,६००/- रू. किं चा माल हस्तगत हिंजवडी पोलीस गुन्हे
शोध पथकाची कामगीरी
मा. पोलीस आयुक्त सो. श्री. अंकुश शिंदे सो यांनी दिनांक ०८/११/२०२२ रोजी ००:०१ वा. ते ०४:०० वा. चे दरम्यान प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत कोंबीग ऑपरेशन राबऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, तसेच नाकाबंदी करून संशईत वाहने चेक करणे या बाबत सुचना दिल्या होत्या. सदरची कारवाई करीत असताना, रात्री ००:३० वा. चे सुमारास सहा. पो. निरीक्षक राम गोमारे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, घोटावडे माण रोडवरील बापूजी मंदीराजवळ माण हिंजवडी पुणे या येथे ५ सशस्त्र इसम पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याचे तयारीने थांबले आहेत. मिळालेल्या बातमी बाबत मा. वरिष्ट पोलीस निरीक्षक श्री. विवेक मुगळीकर यांना कळऊन त्यांनी दिलेल्या आदेशान्वये व सुचनांप्रमाणे, तपास पथकांतील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राम गोमारे तसेच पोलीस पो. हवा / ६९४ शिंदे, पो. हवा / ८३३ शिंदे, मो. हवा / ९५८ कुदळ पो.ना. १६६४/कोळी, पो.ना / १६७६ नरळे पो. कॉ. २४०१ कांबळे, पोकों/ १९७७ राणे असे दोन खाजगी वाहनातून घोटावडे गाण रोडवरील बापुजी मंदीराजवळ गाण हिंजवडी पुणे या ठिकाणी, जाऊन बातमीच्या ठिकाणापासुन थोडया दूर अंतरावर वाहने उभे करून सदर इसमांकडे घातक शस्त्रे असल्याबाबत बातमी असल्याने योग्य ती खबरदारी घेवुन पाहणी करता, बापुजी बुबा मंदीर माण या ठिकाणी मंदीराचे आडोशाला ५ इसम अंधारात दबा धरून थांबलेले दिसल्याने सपोनि गोमारे यांनी नमुद स्टाफचे मदतीने सर्व इसमांना घेरले व संशईत इसम पोलीसांना चुकऊन पळून जाण्याचा प्रयत्नात असताना त्यांना योग्य ती खबरदारी घेऊन आहे त्या परिस्थितीत ०१:१५ वा ताब्यात घेतले. पकडलेल्या इसमांना त्यांची नावे पत्ते विचारता त्यांची नावे
(1) अनिकेत उर्फ मोन्या अनिल शिंदे, 20, रु. स्केच बड सोसायटी अंबडवट गाव, घोटावडे ता. मुळशी जि. पुणे
2) अविनाश घनश्याम पवार वय 30 रा. आलाझीम सोसायटी, फ्लॅट क्र. 302 युरो स्कूल समोर, वाकड, पुणे 3) इस्माल करीम शेख, वय 20, रु. के ढवळे कोयते वस्ती पुनावळे ता. मुळशी जि. पुणे, ४) रामेश्वर साहेबराव तोगरे दिवस २० कि./गायकवाड गणेशनगर थेरगाव पुणे ५) सूरज निरंजन पवार वय २१ रु. आलाझीम सोसायटी फ्लॅट क्र. 302 युरो शाळा वाकड पुणे समोर अशी असल्याचे सांगीतले. त्यांचे कब्जात २ गावठी पिस्टल, २ जीवंत राऊंड १ लोखंडी पालघन,
११ लोखंडी कोयता, मिरची पावडर पुडी ४ मोबाईल हॅन्डसेट असा सर्व मिळून १,२८,६००/- रुपये किंमतीचे साधने मिळून आली. त्यांना विश्वासात घेऊन त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी सांगीतले की, त्यांनी हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ९०४ / २०२२ भादवि कलम ३९५.४२७,५०४, ५०६, आर्म अॅक्ट ४ (२५), क्रीमीनल लॉ अॅडमेन्ट कलम ३ व. ७ महा. पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ हा गुन्हा केला असून त्यामध्ये ते फरार असून ते आतापर्यंत लपून वावरत होते. परंतु त्यांचकडील पैसे संपलेने त्यांनी फेज २ हिंजवडी पुणे येथील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचे उद्देशाने तेथे दबा धरून बसल्याचे त्यांनी सांगीतले. म्हणून त्याचेविरूद्ध हिंजवडी पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम ३९९.४०२ आर्ग अॅक्ट कलम ३ (२५), ४(२५) मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अंकुश शिंदे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ संजय शिंदे सो, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.आनंद भोईटे, पोलीस उप आयुक्त परि. २. पिंपरी चिंचवड मा. श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिंच यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापू देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे). तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सार काटे. राम गोमारे, पोउनि रमेश पवार, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कलास केंगले, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांनी केली आहे.

